धक्कादायक! साताऱ्यातील निरीक्षण गृहातून दोन मुलांचे अपहरण

By दीपक शिंदे | Published: September 20, 2022 01:52 PM2022-09-20T13:52:12+5:302022-09-20T14:42:12+5:30

पोलिसांनी तातडीने तपासाला सुरूवात केली असून, ही मुले त्यांच्या घरी गेली आहेत का, हे पाहण्यासाठी पोलिसांची एक टीम रवाना झाली आहे.

Kidnapping of two children from observation home in Satara | धक्कादायक! साताऱ्यातील निरीक्षण गृहातून दोन मुलांचे अपहरण

धक्कादायक! साताऱ्यातील निरीक्षण गृहातून दोन मुलांचे अपहरण

googlenewsNext

सातारा : येथील निरीक्षण गृहातून १६ आणि १३ वर्षांच्या दोन मुलांचे अपहरण करण्यात आले असून, ही घटना काल, सोमवारी (दि. १९) सकाळच्या सुमारास समोर आली. याबाबत निरीक्षण गृहातील कर्मचारी प्रवीण संभाजी साबळे (वय ५४, रा. शिवथर, ता, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून १६ आणि १३ वर्षांची दोन विधीसंघर्ष बालक निरीक्षण गृहात होती. काल, सोमवारीसकाळी साडेसातच्या सुमारास संबंधित दोन्ही मुले निरीक्षण गृहात नसल्याचे तेथील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी परिसरात शोधाशोध घेतली. परंतु ती मुले कोठेही सापडली नाहीत.

त्यानंतर साबळे यांनी दोन्ही मुलांचे अज्ञाताने फूस लावून अपहरण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तातडीने तपासाला सुरूवात केली असून, ही मुले त्यांच्या घरी गेली आहेत का, हे पाहण्यासाठी पोलिसांची एक टीम रवाना झाली आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक सुधीर मोरे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Kidnapping of two children from observation home in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.