साडेसात लाखांच्या खंडणीसाठी अपहरण

By admin | Published: March 13, 2017 11:27 PM2017-03-13T23:27:16+5:302017-03-13T23:27:16+5:30

अभयचीवाडीतील घटना; सहा दिवसांपासून तरुण गायब; पत्नीची फिर्याद, दोघांवर गुन्हा दाखल

Kidnapping for Rs | साडेसात लाखांच्या खंडणीसाठी अपहरण

साडेसात लाखांच्या खंडणीसाठी अपहरण

Next

कऱ्हाड : साडेसात लाखांच्या खंडणीसाठी दोघांनी युवकाचे अपहरण केले. याबाबत अपहृत तरुणाच्या पत्नीने कऱ्हाड तालुका पोलिसांत फिर्याद दिली असून, पुण्यातील दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संजय बळवंत सुर्वे (वय २८, रा. अभयचीवाडी, ता. कऱ्हाड) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभयचीवाडी येथील संजय सुर्वे हा तरुण शेती करतो. ८ मार्चला संजय व त्याची पत्नी पूनम हे दोघे घरी असताना दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दोघेजण त्यांच्या घरी आले. संजय त्या दोघांनाही ओळखत होता. त्याने त्या दोघांना घरामध्ये घेऊन पत्नी पूनम हिला चहा बनविण्यास सांगितला. पूनम चहा घेऊन आल्यानंतर संजयने त्या दोघांची ओळख करून दिली. एकाचे नाव ऋषिकेश भंडारी, तर दुसऱ्याचे नाव सागर असल्याचे संजयने पूनमला सांगितले. चहा दिल्यानंतर पूनम घरात गेली. काही वेळानंतर त्या दोघांनी संजयला ‘आम्हाला स्टॅण्डवर सोडून ये,’ असे सांगितले. त्यानुसार संजय त्याची दुचाकी (एमएच ५० वाय ३४४) घेऊन त्या दोघांसमवेत घरातून बाहेर पडला. ‘या दोघांना स्टॅण्डवर सोडून मी लगेच परत येतो,’ असे त्याने पूनमला सांगितले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परत आला नाही. त्यामुळे पूनमने त्याच्या मोबाईलवर फोन केला. मात्र, तो बंद होता. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पूनमने संजयची विवाहित बहीण सुलोचना यांना फोन करून घडलेली हकिकत सांगितली. ‘त्यावर आपण उद्यापर्यंत वाट बघू,’ असे सुलोचना यांनी पूनमला सुचविले. त्यामुळे पूनम जेवण करून झोपी गेली. दुसऱ्या दिवशी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास संजयची बहीण अभयचीवाडी येथे आली.
संजयच्या मोबाईलवरून कोणी तरी माझ्या मोबाईलवर फोन केला होता. ‘पाच लाख २४ हजार रुपयांची जुळणी करून ठेवा नाहीतर तुम्हाला जड जाईल. तुमचा भाऊ आमच्या ताब्यात आहे,’ अशी त्या व्यक्तीने मला धमकी दिल्याचे

Web Title: Kidnapping for Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.