मानपूरनगरीचा राजा देवराजचे ‘देवापूर’

By admin | Published: March 31, 2015 10:23 PM2015-03-31T22:23:56+5:302015-04-01T00:06:10+5:30

उज्ज्वल ऐतिहासिक वारसा : चालुक्य, शीलाहार, देवगिरीच्या यादवांनी माणदेशावर केले राज्य --नावामागची कहाणी-तेवीस

King Devaraj's 'Devpur' of Mansuranagar | मानपूरनगरीचा राजा देवराजचे ‘देवापूर’

मानपूरनगरीचा राजा देवराजचे ‘देवापूर’

Next

सचिन मंगरूळे - म्हसवड  दक्षिण हिंदुस्थानात प्राचीन काळी राष्ट्रकुटाची घराणी अनेक ठिकाणी राज्य करीत होती. त्यापैकी या घराण्यातील राजा मानाड्.क याने कुंतल देशात राज्य स्थापन केले. त्याची राजधानी होती ‘मानपूरनगरी’. सध्या राजेवाडी तलावाच्या पाणलोटात ही नगरी स्थिरावली आहे. मानाड्.क राजाचा पुत्र देवराज राज्य करीत होता. याच राजाच्या नावावरून ‘देवापूर’ असे नाव मिळाले, असे ऐतिहासिक संदर्भ देऊन ‘देवापूर’च्या नावामागची कहाणी सांगितली जाते.
राष्ट्रकुट राज्याचा संस्थापक मानाड्.क हा प्रसिद्ध राजा प्रसिद्ध होऊन गेला. त्याचे राज्य कुंतल देशात पसरले होते. (सध्याचे सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे). त्याची राजधानी मानपूर ही म्हसवडच्या आग्नेयेस पाच ते सहा किलोमीटर अंतरावर होती. बावीस बिघ्यांची व बावीस पुरुष उंच बळकट गढी होती. आतमध्ये मोठे वाडे होते. गढीभोवती खंदक होता. त्यातून माण नदीचे पाणी खेळविले होते. हत्ती, उंट, घोड्यांचा येथे बाजार भरत असे.
ही गढी ११८७२ ते १८७८ मध्ये इंग्रज राजवटीत राणी व्हिक्टोरियाने बांधलेल्या स्थिरावली. कंधार (जि. नांदेड) येथील राष्ट्रकुटाची गढी २५ एकराची आहे. ही मानपूरच्या गढीची जुळी बहीण होती. मानपूरपासून दोन मैलावर महादेवाचे मंदिर होते. ते आजही अस्तित्वात आहे. मात्र, देवापूर हे गाव राजेवाडी तलावाच्या पश्चिमेस वसले आहे. गावची लोकसंख्या तीन हजार आहे.
मानाड्.क राजाने इ. स. ३७५ च्या दरम्यान राज्य केले. कुंतल देशाची राजधानी मानपूरनगरी येथे होती. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात देवापूर गावाजवळ सध्याच्या राजेवाडी तलावात हे गाव बुडाले.
देवराज राजानंतर त्यांचा पनतू अभिमन्यू, पुढे राजा गोविंद यांचे माणदेशावर राज्य होते.
देवापूरनगरीच्या जवळ पश्चिमेस महादेव मंदिर असून मंदिरात भव्य असा देखणा नंदी आहे. मंदिराशेजारी मोठी बारव असून शेषयानी भगवान विष्णू, लक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. त्यावर अप्सरा आहेत. त्यास ‘नांगरतास’ असे संबोधले जाते.


मानपूरनगरीचे अवषेश आजही अस्तित्वात
माण तालुक्यातील देवापूरजवळ मानपूरनगरीचे भग्नावषेश आजही पाहायला मिळतात. औरंगजेबाचा खवासपूर येथे तळ असताना मोघलांनी मंदिराची तोडफोड केली. येथून नऊ मैल अंतरावर खवासपूर आहे.



माणदेश दंडकारण्याचा भाग
माणदेश दंडकारण्याचा भाग होता. रामायण, महाभारतकालीन काही संदर्भ या भागात आढळतात. विक्रमादित्य चंद्रगुप्त मौर्य याने आपला राजकवी कालिदास याला समकालीन राष्ट्रकुट राज्याच्या दरबारी दूत म्हणून पाठविले होते. त्यावेळी मानाड्.क राजाचा पुत्र देवराज राज्य करीत होता.

Web Title: King Devaraj's 'Devpur' of Mansuranagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.