राजे जिंकले; दादा वाचले ! यंत्रातील गुपिताची उत्कंठा अन् हुरहूर!

By admin | Published: May 17, 2014 12:22 AM2014-05-17T00:22:32+5:302014-05-17T00:23:53+5:30

सातारा : लोकसभा निवडणुकीत सातारच्या जनतेनं कोणाच्या बाजूनं कौल दिलाय, याचं गुपीत जळगाव, ता. कोरेगावच्या वखार महामंडळाच्या गोदामात दडलं होतं

Kings won; Grandfather read! The secret of the secret of the machine is horroring! | राजे जिंकले; दादा वाचले ! यंत्रातील गुपिताची उत्कंठा अन् हुरहूर!

राजे जिंकले; दादा वाचले ! यंत्रातील गुपिताची उत्कंठा अन् हुरहूर!

Next

सातारा : लोकसभा निवडणुकीत सातारच्या जनतेनं कोणाच्या बाजूनं कौल दिलाय, याचं गुपीत जळगाव, ता. कोरेगावच्या वखार महामंडळाच्या गोदामात दडलं होतं. या गुपिताचं गूढ शुक्रवारी सकाळी ८ पासून उलगडायला सुरुवात झाली. मात्र, त्याआधी राजकीय कार्यकर्त्यांमध्ये दाटली होती उत्कंठा अन् मतदान मशीनमधील गुपिताबाबतची हुरहूर! मतमोजणीसाठी वखार महामंडळाच्या गोदामात विधानसभा मतदारसंघानुसार मतमोजणी केंद्रे करण्यात आली होती. प्रत्येक विधानसभेसाठी वेगळे कंपार्टमेंट केले होते. या प्रत्येक ठिकाणी निवडणूक अधिकारी, कर्मचारी सज्ज झाले होते. प्रत्येक उमेदवारांचे मतमोजणी एजंटही खुर्च्यांवर बसून पहिल्या यादीकडे डोळे लावून बसलेले होते. पहिल्या फेरीची यादी त्यांच्या हातात पडली अन् उत्कंठा संपली! पहिल्या फेरीत उदयनराजेंना १९ हजार ९५ मते मिळाली तर प्रमुख प्रतिस्पर्धी असणारे ‘आप’चे उमेदवार राजेंद्र चोरगे यांना ३ हजार ५२९ मते मिळाली. अपक्ष पुरुषोत्तम जाधव यांना ५ हजार ५४४ मते मिळाली. दुसर्‍या फेरीचा निकालही काहीच वेळात समोर आला. दुसर्‍या फेरीत उदयनराजेंना २० हजार ४२९ मते मिळाली तर त्या खालोखाल पुरुषोत्तम जाधव यांना ५ हजार ४९७ मते मिळाली. राजेंद्र चोरगे यांच्या खात्यात ३ हजार ३४३ मते जमा झाली. नंतर जाहीर होत गेलेल्या प्रत्येक फेर्‍यात उदयनराजेंच्या मतांची आकडेवारी वाढती राहिली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकार्‍यांच्या कक्षात स्वत: जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनंदा गायकवाड, उपजिल्हाधिकारी पराग सोमण, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आनंद कटके या प्रमुख प्रशासकीय अधिकार्‍यांसोबतच आम आदमी पार्टीचे उमेदवार राजेंद्र चोरगे, भारिपचे चंद्रकांत खंडाईत, नगरसेवक अ‍ॅड. दत्ता बनकर, काँगे्रसचे जिल्हा सरचिटणीस सुनील काटकर व इतर काहीजण उपस्थित होते. सुरुवातीला निकालाबाबत असणारी उत्कंठा तिसर्‍या फेरीनंतर जणू मावळलीच. नंतर चर्चा सुरू झाली ती केवळ उदयनराजेंच्या मताधिक्याची! अखेर झालेही तसेच उदयनराजेंना ३ लाख ६६ हजार ५९५ इतके विक्रमी मताधिक्य मिळाले. सातारा लोकसभा निवडणुकीतील निकालाची सर्वच गणिते उदयनराजेंच्या विक्रमी विजयामुळे फोल ठरली. (प्रतिनिधी)

Web Title: Kings won; Grandfather read! The secret of the secret of the machine is horroring!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.