सातारी वारकऱ्यांचं रंगलं पुण्यात कीर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 10:46 PM2018-07-08T22:46:44+5:302018-07-08T22:46:48+5:30
सुनील साळुंखे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाना पेठ पुणे : दोन दिवस पुणे मुक्कामी असणाºया दिंडीने साताºयातील पुणेकर मंडळी निमंत्रण दिल्याने आख्खी कॉलनी, अपार्टमेंट काकडा, हरिपाठ, प्रवचन, कीर्तनाने माउलीमय केली. शनिवार, रविवार सुटी असल्याने बाळगोपाळ, शेजारी-पाजारी व माउलींच्या नाम गजरामुळे आपल्या घरातच तीर्थक्षेत्र निर्माण झाल्याचा भाव पुणेकरांच्या चेहºयावर दिसून येत होता.
साताºयाहून आलेल्या मानाच्या दिंड्या सोडून लहान-मोठ्या प्रत्येक दिंडीने दोन दिवस दुपारी व रात्री चार मुक्काम झाले. प्रत्येक दिंडीने चार सातारकर रहिवासी भाविकांना भेट देऊन पुणेकरांना आनंद दिला. मानाच्या दिंड्या पालखी मुक्कामाच्या आसपास असतात. मात्र पुणेकर मंडळी त्यांना जेवणासह आवश्यक वस्तूंचे वाटप करून सेवा करत आहेत.
पुणेस्थित सातारकरांनी दोन दिवस मुक्कामी माउली दिंडीसह गावाकडच्या ग्रामस्थांची मनो भावे सेवा केली. सातारा जिल्ह्यात जूनअखेर पाऊस पडला. खरीप पेरणीसह कोळपणी उरकून ग्रामीण भागातील तरुण मंडळीसह महिला, वडीलधारी शेतकरी माउलींची संख्या दोन्ही पालखी सोहळे एकत्र आल्याने यावर्षी मोठी दिसत होती.
माउली ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांची पालखीचे प्रस्थान सोमवार, दि. ९ रोजी सकाळी सात वाजता होऊन हडपसरच्या गाडी तळावरील पुलावरून सोलापूर मार्गे तुकाराम महाराजांची तर सासवडचा दिवे घाट पार करून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. दोन दिवस पावसाने विश्रांती दिल्यामुळे वारकरी मंडळींची चांगली व्यवस्था झाली.
माउलीमय वातावरणात दोन दिवस दिंडयाची सेवा करताना पुणेकरांच्या चेहºयावर वेगळाच आनंद दिसत होता. मानाच्या दिंड्या सोडल्या तर इतर जिल्ह्यांतून येणाºया असंख्य दिंड्यातील माउलींची संख्या सरासरी सत्तर ते दीडशेच्या दरम्यान मर्यादित असते. नामस्मरणासह सर्व हेवेदावे विसरून लोक एकत्र आल्याचे चित्र दिसते.
माउलीच्या पालखीबरोबर पायी चालत जाऊन माउली मुक्काम तळावर मिळेल तेथे जागा धरून, नामस्मरण, जेवण व झोपणे हा नित्यक्रम करणारी शहरी भागासह ग्रामीण भागातील प्रत्येक वाड्या-वस्त्यांवरील माळकरी मंडळी किमान हाताच्या बोटावर मोजण्याइतके प्रत्येक वर्षी करत असतात. ही मंडळी डोक्यावर गाठोडे, मुखी नाम, रस्त्याला मिळेल तेथे भोजन, भूमातेचा निवारा, आभाळाचे छत करून पुढे मार्गक्रमण करत असतात.