'किसन वीर' कारखाना निवडणूक निकाल: राष्ट्रवादीच्या नितीन पाटलांची आघाडी, मदन भोसले पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 03:52 PM2022-05-05T15:52:43+5:302022-05-05T15:54:44+5:30

या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर बचाव शेतकरी परिवर्तन पॅनेल विरूध्द माजी आमदार मदन भोसले यांचे शेतकरी विकास पॅनेल अशी चुरशीची लढत झाली.

Kisan Veer factory election results: NCP Nitin Patil leads, Madan Bhosale trailing | 'किसन वीर' कारखाना निवडणूक निकाल: राष्ट्रवादीच्या नितीन पाटलांची आघाडी, मदन भोसले पिछाडीवर

'किसन वीर' कारखाना निवडणूक निकाल: राष्ट्रवादीच्या नितीन पाटलांची आघाडी, मदन भोसले पिछाडीवर

googlenewsNext

सातारा : किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणुकीत कवठे-खंडाळा व भुईंज या सोसायटी गटातही आमदार मकरंद पाटील यांच्या किसन वीर बचाव शेतकरी पॅनेलच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. यामध्ये कवठे-खंडाळा गटात नितीन पाटील यांनी १०,८७८ मते घेऊन आघाडीवर असून भुईंज गटात माजी आमदार मदन भोसले (७०८१ मते) पिछाडीवर आहेत.

किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ६९ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर बचाव शेतकरी परिवर्तन पॅनेल विरूध्द माजी आमदार मदन भोसले यांचे शेतकरी विकास पॅनेल अशी चुरशीची लढत झाली. आज वाई एमआयडीसीतील श्रीनिवास मंगल कार्यालयात मतमोजणी सुरू आहे. एकुण १५४ मतदान केंद्रांपैकी ७७ मतदान केंद्रांची मतमोजणी सध्या सुरू आहे.

या पहिल्या फेरीतील मतमोजणीत आमदार मकरंद पाटील यांच्या पॅनेलने राखीवच्या तीन व महिला दोन जागांवर आघाडी घेतली आहे. तसेच गटाच्या मतमोजणीत कवठे-खंडाळा गटा किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेलचे रामदास गाढवे १०८०६, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन जाधव पाटील यांना १० ८७८, किरण राजाराम काळोखे १०५७१ मते मिळून त्यांनी आघाडी घेतली आहे. तर विरोधी मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलच्या दत्तात्रेय गाढवे यांना ६८६३, प्रवीण विनायक जगताप ७८०६, प्रताप ज्ञानेश्वर यादव ६८०१ मते मिळाली आहे.

भुईंज गटात मकरंद पाटील यांच्या पॅनेलच्या प्रकाश धुरगुडे यांना १०५८३, रामदास महादेव इथापे १०४९७, प्रमोद भानुदास शिंदे यांना १०४५८ मते मिळून आघाडी घेतली आहे. तर शेतकरी विकास पॅनेलच्या जयवंत पवार ६८९५, दिलीप शिंदे ६६६९, मदन प्रतापराव भोसले ७०८१ मते मिळाली आहेत. तर अपक्ष मानसिंग नारायण शिंगटे यांना ७५ मते मिळाली आहेत.

Web Title: Kisan Veer factory election results: NCP Nitin Patil leads, Madan Bhosale trailing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.