किसनवीरचा साखर विक्रीत गफला; निविदा न मागवता विक्री!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:47 AM2021-09-10T04:47:01+5:302021-09-10T04:47:01+5:30
सातारा : किसन वीर साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने साखर विक्रीमध्ये मोठा गफला केल्याचे उघडकीस आले आहे. शासनाच्या नियमानुसार टेंडर ...
सातारा : किसन वीर साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने साखर विक्रीमध्ये मोठा गफला केल्याचे उघडकीस आले आहे. शासनाच्या नियमानुसार टेंडर पद्धतीला फाटा देऊन ठराविक व्यापाऱ्यांवर मेहेरबानी दाखवण्यात आली आहे.
विशेष लेखापरीक्षक यांच्या अहवालानुसार किसनवीर कारखान्याने सन २०१८/१९ मध्ये ५ लाख ८१ हजार ९५० क्विंटल इतकी साखर विक्री केली आहे तर सन २०१९/२० मध्ये मध्ये ४ लाख ७१ हजार १४५ क्विंटल साखर विक्री केली आहे. साखर रिलीज ऑर्डरनुसार मार्च २०१९ व मार्च २०२० मध्ये अनुक्रमे २५ हजार ९९० व ११ हजार ७४० क्विंटल कमी साखर विक्री झाली, त्याला पुढे मुदतवाढ घेतली गेली आहे. तथापि एप्रिल २०१९ ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीत साखर रिलीज ऑर्डरपेक्षा कमी साखर विक्री झाली त्या मुदतवाढ घेतलेली नाही, ही आकडेवारी व साखर विक्री रजिस्टर नुसार सरासरी साखर विक्रीचा दर २ हजार ९३०.५ प्रतिक्विंटल व २०१९/२० मध्ये ३ हजार १२१.७८ प्रतिक्विंटल आहे.
२०१८/१९ v २०१९/२० या आर्थिक वर्षामध्ये जी साखर विक्री केली ती ठराविक व्यापाऱ्यांना केल्याचे निदर्शनास आलेले आहे. भगवानदास दामोदर शहा, दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, श्री दत्त श्री कृष्णा ट्रेडर्स, श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (निर्यात) यांनाच मोठ्या प्रमाणावर साखर विक्री केलेली आहे.
किसन वीर साखर कारखान्याने साखर विक्री करत असताना विहित निविदा पद्धतीचा अवलंब केलेला नाही. साखर विक्रीचे स्पर्धात्मक दर मिळण्याकरिता वर्तमानपत्रात वेळोवेळी घरात देणे आवश्यक असताना ती दिलेली नाही. तसेच ई-टेंडरिंगनुसार साखर विक्री केलेली नाही. मोठ्या प्रमाणात ठराविक साखर व्यापारी यांना निविदा न मागविता साखर विक्री केल्याचे दिसून आले आहे. मिनिस्त्री ऑफ कन्सुमर फूड अंड पब्लिक दिस्त्रिबशन नवी दिल्ली यांचे दिनांक ७ जुन २०१८ चे परिपत्रकानुसार २९ रुपये प्रति किलो व १४/०२२०१९ च्या परिपत्रकानुसार ३१ रुपये प्रतिकिलो दर निश्चित केला आहे. साखर विक्री करताना विविध व्यापाऱ्यांकडून फोनवरून साखर खरेदीचे दर मागणी घेतली जाते व ही माहिती साखर विक्री टेंडर्स त्यामध्ये नमूद केली जाते. आणि संचालक मंडळ सभा साखर विक्री उपसमिती सभेचा मंजुरीने दराने साखर विक्री केली जाते. साखर व्यापारी व साखर कारखाना यांच्यात साखर खरेदी विक्रीबाबत केलेला दिसत नाही तसेच सुरक्षा अनामत रक्कमदेखील घेतली नाही. साखर विक्री करण्यापूर्वी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विचारात घेतलेली दिसून येत नाहीत. साखर विक्री टेंडर मागणीचा त्यामध्ये विविध व्यापाऱ्यांकडून आले तर व साखरेची मागणी नमूद केलेले आहे. त्यामध्ये साखर संघ व इतर सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे दर नमूद केले आहेत तर संबंधित कारखान्याकडून लिखित स्वरूपात आलेले पाहावयास मिळाले नाहीत न मतदारांचा कारखान्याने कमी दराने विक्री केल्याचे दिसून आले आहे तसेच त्यांनी नमूद केलेल्या साखर मागणीपेक्षा कमी केली आहे.
दोन वर्षांमध्ये तब्बल ५२ लाखांचा तोटा
ही साखर २६ हजार क्विंटल विक्रीची रक्कम २ हजार ७०० रुपये २०/०९/२०१८ रोजी सात कोटी दोन लाख रूपये जमा झाले आहेत. केंद्र शासन आदेश दि. २८/०९/२०२८ मधील ठरवून दिलेल्या निर्यात कोट्याव्यतिरिक्त साखर निर्यात केल्याबाबत जमा खर्च केला आहे. ०७/०६/२०१८ चे परिपत्रकानुसार किमान २९ रुपये प्रतिकिलो दराने सदर साखर विक्री झाली असती तर कारखान्याला ७ कोटी ५४ लाख रुपये मिळाले असते, याबाबत योग्य खुलासा मागविण्यात आला आहे. अशा चुकीच्या व्यवहारामुळे कारखान्याला तब्बल ५२ लाख रुपयांचा तोटा झाला आहे.