पेट्रोल, डिझेलच्या दराने किचन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:25 AM2021-07-08T04:25:46+5:302021-07-08T04:25:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : दिवसागणिक वाढ होत असलेल्या इंधनाच्या दराने सर्वांचेच कंबरडे मोडले आहे. किचन कोलमडून गेले असून, ...

Kitchen collapses at the rate of petrol, diesel | पेट्रोल, डिझेलच्या दराने किचन कोलमडले

पेट्रोल, डिझेलच्या दराने किचन कोलमडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : दिवसागणिक वाढ होत असलेल्या इंधनाच्या दराने सर्वांचेच कंबरडे मोडले आहे. किचन कोलमडून गेले असून, किराणा, भाजीपाला या जीवनाश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.

कोरोनाच्या काळातच लोकांच्या खिशात पैसे नाहीत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर ज्यांच्या नोकऱ्या टिकल्या त्यांना पगारवाढ झालेली नाही. या परिस्थितीत इंधन दरवाढ सुरुच आहे. केंद्र व राज्य शासन याविरोधात एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. तर याच मुद्द्यावरुन एकमेकांविरोधात आंदोलनेदेखील करताना दिसतात. केंद्र व राज्य या दोन्ही शासनांनी इंधनावर आकारत असलेले कर कमी केले तरी इंधन दरवाढ संपुष्टात येईल तसेच लोकांना परवडेल इतक्या किमतीत इंधन घेता येईल. यामुळे मालाची झालेली भाववाढदेखील कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

२) पत्ताकोबी ६० रूपये किलो

भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडले आहेत. डिझेल वाढल्याने वाहतूकदार ज्यादा भाडे आकारत आहेत. कोबी ४० रुपये किलोने मिळत होता, तो आता ६० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.

अ कोबी : ६० रुपये किलो

ब टोमॅटो : ५० रुपये किलो

क फ्लाॅवर : ८० रुपये किलो

ड वाटाणा : ८० रुपये किलो

३) डाळीसह तेल महाग

इंधन दरवाढीचा फटका किराणा मालाच्या दरवाढीमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. डाळ, स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे तेल महागले आहे. कुटुंबासाठी २ हजार रुपयांत महिन्याचा किराणा मिळत होता, आता त्यासाठी ३ हजार रुपये खर्चावे लागत आहेत.

४) ट्रॅक्टरची शेतीही महागली

बैलांची मशागत आता अल्पप्रमाणात केली जाते. ट्रॅक्टरचा वापर मशागतीसाठी वाढलेला आहे. नांगरटीसाठी ८०० रुपये एकरी घेतले जात होते. आता १,२०० रुपये मोजावे लागत आहेत. डिझेलचे दर दिवसागणिक वाढले असल्याने ट्रॅक्टर मालक मशागतीच्या खर्चात आणखी वाढ करत आहेत.

५) घर चालविणे झाले कठीण

(दोन गृहिणींच्या प्रतिक्रिया)

कोट...

आम्ही दोनवेळा भाज्या करत होतो. आता एकाचवेळची भाजी शिजवतो. एकवेळ आमटी-भात खाण्यावरच भर देतो आहे. भाज्यांचे दर कमी येत नाहीत. किराणाही वाढल्याने घर चालविणे कठीण झाले आहे.

दमयंती साळुंखे

कोट..

रोजच्या जेवणामध्ये चपाती वेगळी, भाकरी वेगळी भाज्याही प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगवेगळ्या करत होतो. आता मात्र कुटुंबातील सगळ्यांनीच आपल्या आवडीनिवडीला मुरड घातलेली आहे.

संगिता बाबर

६) दोन व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया (एक भाजीपाला व्यापारी, एक किराणा)

कोट..

शेतकरी भाड्याचे वाहन घेऊन आम्हाला माल घालतात. शेतकऱ्यांना याचा खर्च येतो. वाहनचालकांनीही आता भाडेवाढ केली असल्याने शेतकऱ्यांना अधिकचा दर द्यावा लागतो आहे. त्याशिवाय शेतकरीही माल घालत नाहीत.

अस्लम मुलाणी

कोट...

शासन इंधनाचे भाव दिवसागणिक वाढवत आहे. गुजरात, मुंबई या परिसरातून माल साताऱ्यात येतो. टोलनाक्यांचा खर्च कायमच कळीचा मुद्दा आहे. त्यात डिझेल भाववाढीमुळे मालवाहतूक वाढलेली आहे.

सुरज भंडारी

असे वाढले पेट्रोल-डिझेलचे दर (ग्राफ)

पेट्रोल डिझेल

जानेवारी २०१८ ७८.३६ ६२.९०

जानेवारी २०१९ ७४.९५ ६५.१७

जानेवारी २०२० ८१.३२ ७०.७१

जानेवारी २०२१ ९३.४७ ८२.६३

फेब्रुवारी ९८.०७ ८७.७२

मार्च असे वाढले पेट्रोल-डिझेलचे दर (ग्राफ)

पेट्रोल डिझेल

जानेवारी २०१८ ७८.३६ ६२.९०

जानेवारी २०१९ ७४.९५ ६५.१७

जानेवारी २०२० ८१.३२ ७०.७१

जानेवारी २०२१ ९३.४७ ८२.६३

फेब्रुवारी ९८.०७ ८७.७२

मार्च ९८.०७ ८७.७२

एप्रिल ९७.३३ ८७.१०

मे १०१.०३ ९१.५६

जून १०५.४२ ९५.७३

जुलै १०५.७५ ९५.७३

एप्रिल ९७.३३ ८७.१०

मे १०१.०३ ९१.५६

जून १०५.४२ ९५.७३

जुलै १०५.७५ ९५.७३

Web Title: Kitchen collapses at the rate of petrol, diesel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.