शॉक लागण्याची भीती व्यक्त केल्याने चाकूने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:21 AM2019-04-22T10:21:00+5:302019-04-22T10:22:02+5:30
सातारा : मोटारच्या वायरचा शॉक लागण्याची भीती व्यक्त केल्याने चिडून जाऊन बबन नाना काळे (वय ४९,रा. वांजळवाडी, पो. रोहोट ...
सातारा : मोटारच्या वायरचा शॉक लागण्याची भीती व्यक्त केल्याने चिडून जाऊन बबन नाना काळे (वय ४९,रा. वांजळवाडी, पो. रोहोट ता. सातारा) यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
संतोष मारूती काळे, मंदा संतोष काळे, कोंडाबाई मारूती काळे (सर्व रा. वांजळवाडी, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बबन काळे यांनी पुतणी समिक्षा काळे हिला तुमच्या मोटारची वायर जमिनीतून किंवा उंचावरून घेऊन जा, आम्हाला शॉक लागण्याची भीती वाटत आहे, असे सांगितले.
यावरून वरील संशयितांनी बबन काळे यांना चाकूने वार करून जखमी केले. तसेच लाथाबुक्क्याने मारहाणही केली. भांडणे सोडविण्यास आलेल्या त्यांच्या पत्नीलाही त्यांनी मारहाण केली. या झटापटीत पत्नीच्या मंगळसूत्रातील मनी तसेच पायातील पैंजण हरवले.