जिल्ह्यात जानकर अन् भाजप दूरच..-बातमी मागची बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:30 AM2018-03-16T00:30:52+5:302018-03-16T00:30:52+5:30

म्हसवड : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर आपल्या स्वत:च्या नोंदणीकृत पक्षाचे अध्यक्ष असताना मात्र सभागृहात ते भाजपचे सदस्य आहेत.

Knowing the district and the BJP far away ..- News | जिल्ह्यात जानकर अन् भाजप दूरच..-बातमी मागची बातमी

जिल्ह्यात जानकर अन् भाजप दूरच..-बातमी मागची बातमी

Next
ठळक मुद्देस्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सवतासुभा : माण तालुक्यातील कार्यकर्ते एकमेकांपासून लांबच-

सचिन मंगरुळे ।
म्हसवड : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर आपल्या स्वत:च्या नोंदणीकृत पक्षाचे अध्यक्ष असताना मात्र सभागृहात ते भाजपचे सदस्य आहेत. त्यामुळे ते कोणत्या पक्षाचे आहेत? असा सवाल शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित करून माण तालुक्याचे सुपुत्र दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री जानकर भाजप की रासपचे? हा प्रश्न ऐरणीवर आणला असला तरी माण तालुक्यातील स्थानिक भाजपा आणि रासपचे कार्यकर्ते व नेते अजून तरी एकत्रित आल्याचे चित्र दिसून येत नाही.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीत सहभागी झाला होता. या निवडणुकीत माणची जागा वाटपात रासपकडे गेली. रासपचे शेखर गोरे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत पक्षाला दोन नंबरची मते मिळाली. या निवडणुकीचा अपवाद वगळता रासप व भाजपाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढवल्या नसल्याची वस्तुस्थिती आहे.

रासपने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांत खटाव तालुक्यात स्वतंत्र पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली तर माणमध्ये आंधळी गटात पक्षाच्या चिन्हावर स्वतंत्र उमेदवार उभा केला होता तर मार्डी गटात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करून निवडणूक लढवली होती.

यामध्ये रासपच्या वाट्याला वरकुटे-म्हसवड पंचायत समिती गण आला होता. याठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते बबनदादा विरकर यांच्या पत्नीला उमेदवारी दिली होती. राष्ट्रीय समाज पक्षाचे व भाजपाचे नेते व कार्यकर्तेे एकत्रितपणे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात आल्याचे दिसून आले नाहीत.
 

आजवर सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आमचा वापर करून घेतला. आजवर राष्ट्रवादीला पाठिंबा दिलेली ही शेवटचीच चूक यापूढच्या कोणत्याही निवडणुका असू द्या, आमचा राष्ट्रीय समाज पक्ष व भारतीय जनता पक्ष युती करूनच निवडणुकीस सामोरे जाणार आहोत.
-मामूशेठ वीरकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष


मुळातच महादेव जानकर यांनी भाजपासोबत जायला नको होते. त्यांनी रासपच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे, ते सध्या अध्यक्ष नाहीत तर सध्या या पक्षाचे अध्यक्ष अक्किसागर आहेत. मुळातच भाजपाचे षडयंत्र प्रादेशिक पक्ष संपवायचे आहे, त्याचेच बळी महादेव जानकर ठरले आहेत.
- मारुती जानकर, राज्याध्यक्ष, मल्हार क्रांती संघटना

Web Title: Knowing the district and the BJP far away ..- News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.