ज्ञानामुळे जीवन सुंदर बनता येते!
By admin | Published: June 28, 2015 10:32 PM2015-06-28T22:32:14+5:302015-06-29T00:28:30+5:30
शारदा शित्रे : ‘पगारातून आयकर कपात’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी गौरवोद्गार
सातारा : ‘आयुष्यात अनेक चुका अज्ञानाने घडतात पण ज्ञान आले तर त्या टाळून जीवन सुंदर करता येते. आयकरदात्यांच्या बाबतीत कायद्याचे ज्ञान देणारे पगारातून आयकर कपात मार्गदर्शिका म्हणूनच मोलाचे वाटते. गेली २० वर्षे सातत्याने हे कार्य अरूण गोडबोले निरपेक्ष भावनेने करीत आहेत याची कृतज्ञ जाणीव वाचकांच्या मनात निश्चित आहे,’ असे मत लेखिका शारदा शिंत्रे यांनी व्यक्त केले. अरूण गोडबोले यांनी लिहिलेल्या आणि कौशिक प्रकाशनातर्फे प्रसिध्द होणाऱ्या पगारातून आयकर कपात मार्गदर्शिका आर्थिक वर्ष २०१५-१६ या पुस्तकाचे प्रकाशनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पुस्तकाचे लेखक अरूण गोडबोले, उदयन गोडबोले, अनुपमा गोडबोले उपस्थित होत्या.
शित्रे म्हणाल्या, ‘कौशिक प्रकाशनाने अर्थ, कायदा, प्रवासवर्णने, आत्मचरित्रे, अध्यात्मिक असे सर्व प्रकारचे साहित्य व सीडीज प्रकाशित करून आपली वाटचाल सर्व समावेशक ठेवली आहे. याचबरोबर अनेक नवीन लेखकांनाही त्यांनी संधी दिली आहे. हे मोलाचे काम कौशिक प्रकाशनाने केले आहे.
लेखक आणि प्रकाशन अरूण गोडबोले म्हणाले, ‘उत्पन्न करावर २० वर्षे दरवर्षी सातत्याने सुधारित आवृती प्रकाशित होणारे हे एकमेव पुस्तक आहे. उदयन गोडबोले यांनी आभार मानले.
अशोक शिंत्रे, अनुपमा गोडबोले उपस्थित होते. (प्रतिनिधी)