ज्ञानाचा खजिना रद्दीच्या भावात !

By Admin | Published: December 17, 2015 10:37 PM2015-12-17T22:37:46+5:302015-12-17T22:59:35+5:30

कवडीमोल दर : पाच ते दहा रुपये दरात खरेदी-विक्री; पाठ्यपुस्तकांचा समावेश जास्त

Knowledge of treasure is worth the trash! | ज्ञानाचा खजिना रद्दीच्या भावात !

ज्ञानाचा खजिना रद्दीच्या भावात !

googlenewsNext


कऱ्हाड : विद्यादान घडविणाऱ्या पाठ्यपुस्तकांतून अनेक जण ज्ञानार्जन करतात. अशा ज्ञानाजर्नाच्या साहित्याची, अमूल्य ठेव्याची किंमत मात्र, काही ठिकाणी कवडीमोलाची केली जात आहे. रद्दीविक्रीच्या दुकानात अभ्यासक्रमाची तसेच नामवंत लेखकांच्या पुस्तकांची किंमत वजनाच्या हिशोबाने केली जातेय.
शंभर ते तीनशे रुपयांना विकत मिळणाऱ्या पाठ्यपुस्तकांना तसेच नामवंत विचारवंत, लेखक, साहित्यिकांच्या पुस्तकांची किंमत इथे मात्र, सात रुपये किलो दराने लावली जात आहे. त्यामुळे एकेकाळी ज्ञानार्जनाच्या साहित्यांना असलेले महत्त्व आताच्या काळात कमी होत असल्याचे दिसून येते.
शैक्षणिकदृष्ट्या पाठ्यपुस्तकांना आजही महत्त्व प्राप्त झाले आहे. अगदी पूर्वापार परंपरेपासून ज्ञानेश्वरी, महाभारत तसेच भगवत गीता, कुराण अशा धर्मग्रंथांना आजही ज्ञानार्जनाचा अमूल्य ठेवा म्हणून महत्त्व दिले जाते. दुसरीकडे मात्र, अशा रद्दी व्यावसायिकांमुळे शालेय पाठ्यपुस्तके तसेच रद्दीला कवडीमोलाचा दर दिला जातो. वाचनाची आवड असलेल्या व्यक्ती हव्या तेवढ्या किंमतीमध्ये पुस्तके विकत घेतात. मात्र, दुसरीकडे हीच पुस्तके आपन ठरवून दिलेल्या दराप्रमाणे रद्दीवाले खरेदी करतात. त्यामुळे एक व्यावसायिक दृष्टीकोनातून पाठ्यपुस्तके तसेच ज्ञानार्जनाच्या साहित्याकडे रद्दीवाल्यांकडून पाहिले जाते.
रद्दीविक्री करणारे व्यापारी आपल्या व्यवसायासाठी गरीब तसेच गरजू व्यक्तिंना हाताशी धरून शहरी तसेच ग्रामीण भागातून पाठ्यपुस्तकांची रद्दी खरेदी कवडीमोल दरात खरेदी करून घेतात. त्यानंतर एकत्र होणारी रद्दी गोदामात साठविली जाते. अशा प्रकारे दहा ते वीस रुपये किलो दराने खरेदी केलेली रद्दी आठवड्यातून एकदा मुंबई तसेच पुणे या ठिकाणी पाठविली जाते. आठवडाभर एकत्र करून एकदम ट्रकने रद्दीची विक्री केल्याने व्यापाऱ्यास चांगलाच फायदा होतो. कवडीमोल दरात महागड्या पुस्तकांची रद्दी विकत घेऊन त्यांची विक्री करणाऱ्या दुकानदारांचाही चांगला व्यवसाय होत आहे.


रद्दीविक्रीतून पेैसेकमाई
कऱ्हाड शहरात गल्लोगल्ली रद्दीविक्री करणारी दुकाने मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. छोट्या-मोठ्या दुकानांसह यामध्ये काम करणारे कर्मचारीही मोठ्या संख्येने आहेत. मोठ्या रद्दीविक्री करणाऱ्या व्यापाऱ्याच्या दुकानात तीन ते चार कामगार काम करण्यासाठी आहेत. त्यांच्याकडून शहरात फिरून पेपर, पुस्तक यांच्या रद्दीसह भंगाराचे साहित्यही कवडीमोल दरात लोकांकडून विकत घेतले जाते. व ते एकत्र केले जाते. या व्यवसायातून कर्मचाऱ्यांना दिवसाला तीनशे ते चारशे रुपये सहज मिळतात.

असा
चालतो व्यवसाय..!
दिवसाला एकत्रित होणारी रद्दी तसेच भंगाराचे साहित्य हे आठवडाभर शहरातील गोडावूनमध्ये साठविले जाते. आठवडा पूर्ण झाला की ती रद्दी एकदम किराणा माल, साहित्य विक्री करणारे तसेच वडापाव विक्री करणाऱ्या दुकानदारांना घातली जाते. यातून रद्दीविक्री करणाऱ्या व्यापाऱ्यास चांगली कमाई मिळते.


पुस्तकांची रद्दी
सात रुपयात
विविध विचारवंत, साहित्यिक तसेच लेखकांची पुस्तके तसेच शालेय पाठ्यपुस्तके ही फक्त ७ रुपये किलो दराने विकली जातात. साहित्यिकांचे व नामवंत लेखकांच्या विचारांना कवडीमोल दराने लोकांकडून अशा प्रकारे विकले जाते.


पाठ्यपुस्तकांचा बदलता अभ्यासक्रम
राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून सर्वशिक्षण अभियानांतर्गत शाळेतील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळेतील मुलांना दरवर्षी मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाते. यातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा हा मुख्य उद्देश असतो. मात्र, दुसरीकडे वर्षातून तसेच दोन वर्षांतून एकदा शालेय अभ्यासक्रम बदलत असल्याने पाठ्यपुस्तके ही विद्यार्थ्यांच्या पालकांकडून रद्दीच्या स्वरूपात विकली जातात.

Web Title: Knowledge of treasure is worth the trash!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.