कोडोलीचे ग्रामविकास अधिकारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 04:38 PM2017-08-17T16:38:39+5:302017-08-17T16:38:39+5:30
सातारा : ग्रामपंचायतीचे दप्तर विना परवाना कार्यालयातून घेऊन गेल्याचा व अपहार केल्याचा आरोप असणारे कोडोली, ता. सातारा येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी के. एच. मोरे यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निलंबित केले आहे.

मोरे हे कोडोली ग्रामपंचायतीचे दप्तर विना परवाना कार्यालयातून घेऊन गेले व अपहार केला, असा आरोप ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी केला होता. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही सुरू केले होते.
या तक्रारीनंतर डॉ. देशमुख यांनी गटविकास अधिकाºयांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यानंतर कोडोलीच्या ग्रामपंचायत सदस्यांनी माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, जिल्हा परिषद सदस्या अर्चना देशमुख, सरपंच वनीता खंडागळे, संदीप शिंदे, प्रवीण धस्के, अॅड. श्रीकांत केंजळे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडले.