तब्बल ४६ घरफोड्या करणाऱ्या कोहिनूरला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 10:33 AM2019-12-21T10:33:46+5:302019-12-21T10:34:41+5:30
वडूज, म्हसवड, पुसेगाव, औंध या पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ४६ घरफोड्या करणाऱ्या कोहिनूर जाकीर काळे (रा. बुध,ता. खटाव) याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. वडूज पोलिसांच्या ताब्यात त्याला पुढील तपासासाठी देण्यात आले आहे.
सातारा : वडूज, म्हसवड, पुसेगाव, औंध या पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ४६ घरफोड्या करणाऱ्या कोहिनूर जाकीर काळे (रा. बुध,ता. खटाव) याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. वडूज पोलिसांच्या ताब्यात त्याला पुढील तपासासाठी देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा, सांगली जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्या टोळीचा यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने भांडाफोड करून संशयितांना अटक केली आहे. मात्र, कोहिनूर हा त्या ८५ घरफोड्यापैकी ४६ घरफोड्या गुन्ह्यात आरोपी होता. मात्र, गुन्हे दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. मात्र, तो दि. १९ रोजी बुध येथील त्याच्या घरी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांच्या पथकाने बुध येथे संशयिताच्या घरी छापा मारून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने ४६ घरफोड्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याला वडूज पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, सहायक फौजदार विलास नागे, ज्योतीराम बर्गे, हवालदार संतोष जाधव, प्रवीण कडव, मोहन नाचण, योगेश पोळ, गणेश कापरे, धीरज महाडिक, वैभव सावंत, केतन शिंदे यांनी केली.