कोकिळेचा जीवनदात्याशी लागलाय लळा!
By admin | Published: July 15, 2017 01:58 PM2017-07-15T13:58:40+5:302017-07-15T13:58:40+5:30
किती बी सोडलं तरी घराकडं येतीय : वाईतील विठ्ठल गोळे यांच्या घरातच मुक्काम
आॅनलाईन लोकमत
सातारा , दि. १५ :मित्राशी गप्पा मारत असताना जखमी अवस्थेतील कोकिळा जमिनीवर पडली... तिला पाहून त्यांचा जीवही कळवळला... सोडून जावं तर पशुपक्षी लचके तोडतील म्हणून तिला घरी नेलं... उपचार केलं, खाऊ-पिऊ घातलं अन् कोकिळेला या कुटुंबाचं लळाच लागला. तिला बाहेर सोडलं तरी घरातच येतीय. सध्या ती घरात मोकळी वावरतेय.
गेली सांगून ज्ञानेश्वरी, माणसा परीस मेंढरं बरी... हे जगदीश खेबुडकरांचं गाणं सर्वांनाच आठवत असेल. हे गाणं किती खरं आहे, याचं उदाहरण वाईमध्ये अनुभवास मिळत आहे.
वाईमधील मल्लखांब व जिमनॅस्टिक प्रशिक्षक विठ्ठल गोळे हे गुरुवारी मित्रांना सोडण्यासाठी वाई येथील बसस्थानकात गेले होते. त्याठिकाणी दुचाकीशेजारी उभारून मित्राशी गप्पा मारत असतानाच त्यांच्या गाडीजवळ घाबरलेल्या अवस्थेत असलेली कोकिळा जमिनीवर पडली. तिच्या पाठीवर जखम झाली होती. तिला उडता येत नव्हतं. तिला पाहून गोळे यांचे मन हेलावलं. तिला सोडून द्यावं तर बसस्थानक परिसरातील पशुपक्षी मारून टाकतील. त्यामुळे गोळे यांनी तिला घरी नेण्याचा निर्णय घेतला.