साताऱ्यातही ‘कोल्हापूर पॅटर्न’; एकरकमी देणार एफआरपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:05 PM2018-11-11T23:05:52+5:302018-11-11T23:06:30+5:30

सातारा : एफआरपी अधिक दोनशे रुपयांची मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन केले. त्यानंतर ...

'Kolhapur Pattern' in Satara; Single-headed FRP | साताऱ्यातही ‘कोल्हापूर पॅटर्न’; एकरकमी देणार एफआरपी

साताऱ्यातही ‘कोल्हापूर पॅटर्न’; एकरकमी देणार एफआरपी

Next

सातारा : एफआरपी अधिक दोनशे रुपयांची मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन केले. त्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकाºयांच्या मध्यस्थीने साखर कारखानदार व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांची बैठक झाली. यावेळी एकरकमी एफआरपीची पहिली उचल देण्याच्या ‘कोल्हापूर पॅटर्न’वर तोडगा निघाल्याने जिल्ह्यात आंदोलन स्थगित करण्यात आले.
जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत खासदार राजू शेट्टी यांनी एफआरपी अधिक दोनशे रुपयांची मागणी करून आंदोलनचे रणशिंग फुंकले होते. त्यामुळे गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून ऊसदराची कोंडी झाली होती. शनिवारी कोल्हापूरमध्ये झालेल्या बैठकीत कारखानदार व शेतकरी संघटनेच्या बैठकीत एकरकमी एफआरपी देण्याची तयारी दर्शविल्याने कोंडी फुटली.
या पार्श्वभूमीवर साताºयात जिल्हा नियोजन भवनात जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील बारावकर, उपअधीक्षक समीर शेख, स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, जिल्हाध्यक्ष राजू शेळके, सचिनकुमार नलावडे, बळिराजाचे संस्थापक पंजाबराव पाटील, रयत क्रांतीचे संजय भगत, प्रकाश साबळे, शरद जोशी प्रणीत संघटनेचे बाळासाहेब चव्हाण, भूमाता ब्रिगेडचे धर्मराज जगदाळे यांच्यासह जिह्यातील शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते व कारखान्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला संघटनेच्या पदाधिकाºयांनी मागील थकबाकी आणि एफआरपीच्या मुद्द्यावरून कारखान्यांच्या प्रतिनिधींना कोंडीत पकडले. तब्बल दोन तास चाललेल्या चर्चेनंतर कारखानदारांनी सांगली, कोल्हापूरच्या कारखानदारांप्रमाणे एफआरपी देण्याचे मान्य केले. तसेच मागील वर्षीची दोनशे रुपयांची उर्वरित रक्कम उपलब्धतेनुसार द्यायचे आणि साखरेचे भाव वाढल्यास या गळीत हंगामातील दोनशे रुपये देण्याचे कबूल केले. यास शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी सकारात्मकता दाखवली.
दरम्यान, कारखानदार व शेतकरी संघटना यांनी नियम मोडला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. कारखान्यांनी एका महिन्यात ते पैसे दिले नाहीत तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिला. त्यानंतर स्वाभिमानीचे प्रवक्ते अनिल पवार यांनी आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली.
कारखान्यांनी जाहीर केलेले दर
कारखाना एफआरपी
जयवंत २९५६
कृष्णा २९४६
अजिंक्यतारा २८२०
किसन वीर २७००
गोपूज २६१८
सह्याद्री २८५०
कारखाना एफआरपी
बाळासाहेब
देसाई २७२२
शरयू २४१५
स्वराज २२१५
जरंडेश्वर २६९८
रयत २६१७

Web Title: 'Kolhapur Pattern' in Satara; Single-headed FRP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.