कोल्हापूरच्या ‘एएस ट्रेडर्स’च्या फसवणुकीचं लोण साताऱ्यातही

By दत्ता यादव | Published: August 23, 2023 10:34 PM2023-08-23T22:34:10+5:302023-08-23T22:34:15+5:30

१४ गुंतवणूकदारांना ७० लाखांना गंडा; दरमहा तीन टक्के परताव्याचे आमिष

Kolhapur's 'AS Traders' fraud is pickled in Satara too | कोल्हापूरच्या ‘एएस ट्रेडर्स’च्या फसवणुकीचं लोण साताऱ्यातही

कोल्हापूरच्या ‘एएस ट्रेडर्स’च्या फसवणुकीचं लोण साताऱ्यातही

googlenewsNext

सातारा : कोल्हापुरातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ‘एएस ट्रेडर्स’ कंपनीच्या फसवणुकीचं लोण साताऱ्यातही पोहोचलं असून, आतापर्यंत १४ गुंतवणूकदारांना तब्बल ७० लाखांना गंडा घातला असल्याचे समोर येत आहे.या गुंतवणूकदारांना दरमहा तीन टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून पैसे लाटण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांचीफसवणूक होऊनही साताऱ्यात अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही.

कोल्हापूर स्थित एएस ट्रेडर्स कंपनीने कमी कालावधीत मोठा परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने कोल्हापुरातील गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. कमिशन एजंटद्वारे लोकांनी या कंपनीमध्ये आपले पैसे गुंतवले. काही महिने गुंतवणूकदारांना परतावा सुद्धा मिळाला. परंतु त्यानंतर परतावा बंद झाला. तेव्हा कोल्हापुरातील गुंतवणूकदारांनी एएस ट्रेडर्सच्या विरोधात धाव घेऊन तक्रार दाखल केली. मुख्य संशयित लोहितसिंग धर्मासिंग सुभेदार याच्यासह २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु केवळ कोल्हापुरातील गुंतवणूकदारांना या एएस ट्रेडर्सने गंडा घातला नसून, याचे लोण सातारा जिल्ह्यातही पोहोचले आहे. अस्मिता गोसावी नामक महिलेच्या ओळखीने साताऱ्यातील गुंतवणूकदारांनी एएस ;ट्रेडर्समध्ये पैसे गुंतवल्याचे समोर येत आहे. गोडोली परिसरातील एका हाॅटेलमध्ये या महिलेने गुंतवणूदारांशी बैठक घेऊन या कंपनीत परतावा कसा चांगला मिळतो, हे पटवून दिले. त्यामुळे त्या महिलेवर विश्वास ठेवून साताऱ्यातील १४ गुंतवणूकदारांनी तब्बल ७० लाख रुपये त्या कंपनीत गुंतवले. आता या कंपनीच्या मुख्य सूत्रधारासह एजंटांनीही घाशा गुंडळल्याने साताऱ्यातील गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत. आमचाही गुन्हा दाखल करावा, असा अर्ज सर्व गुंतवणूदारांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वीच दिला आहे. परंतु अद्यापही एएस ट्रेडर्स कंपनीवर गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे गुंतवणूकदार हवालदील झाले आहेत.


चाैकट : यांची झाली फसवणूक...


सुस्मिता प्रशांत मकोटे : साडेसात लाख

अनिता सुरेश मकोटे : पाच लाख

रुपाली पाखले : ४ लाख

साईनाथ सावंत : ४ लाख

ए. व्ही. घाडगे : ७ लाख

व्ही. एस. घाडगे : २० लाख

भरत सोपान घाडगे : सव्वासहा लाख

ऐश्वर्या संजय घाडगे : पाच लाख

गाैरी चंद्रकांत बर्गे : सव्वातीन लाख

विपुल अर्जुन कदम : सव्वातीन लाख

संदीप सुदाम कदम : दोन लाख

प्रियांका संदीप कदम : ५० हजार

प्रतिभा रामचंद्र जाधव : एक लाख

श्वेता सुनील सोनावणे : ५० हजार 


चाैकट : अनेकांनी प्राव्हिडंट फंडही गुंतवला

कोल्हापूरच्या एएस ट्रेडर्स कंपनीमध्ये अनेकांनी दागिने गहाण ठेवून, कर्ज काढून तसेच प्राव्हिडंट फंड काढून पैसे गुंतवले आहेत. चार पैसे जास्तीचे मिळाले तर कुटुंबाला जरा चांगले आयुष्य देऊ शकू,या इच्छेने पैसे गुंतवल्याचे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. मात्र, पैसे बुडाल्याने गुंतवणूकदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत

Web Title: Kolhapur's 'AS Traders' fraud is pickled in Satara too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.