कोल्हापूरच्या मराठा क्रांती मोर्चातही लाखभर सातारकर !

By Admin | Published: October 15, 2016 11:41 PM2016-10-15T23:41:22+5:302016-10-15T23:41:22+5:30

जिकडं पहावं तिकडं एमएच ११ : मोर्चात सहभागी होऊन दाखवून दिली एकीची ताकद

Kolhapur's Maratha Kranti Morcha is also worth lakhsarkar! | कोल्हापूरच्या मराठा क्रांती मोर्चातही लाखभर सातारकर !

कोल्हापूरच्या मराठा क्रांती मोर्चातही लाखभर सातारकर !

googlenewsNext

सातारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर मराठा क्रांती मूक मोर्चा निघत आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील मोर्चात लाखोंच्या संख्येने समाजबांधव सहभागी होत आहेत. कोल्हापूरमध्ये निघालेल्या मोर्चात खरी ताकद दाखविण्यासाठी सातारा जिल्हा धावून गेला आहे. सुमारे लाखभर सातारकर या मोर्चात सहभागी झाले आहेत.
साताऱ्याच्या महामोर्चात सहभागी होण्यासाठी पुणे, मुंबई, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर जिल्ह्यातून समाजबांधव आले होते. सातारकरांनी हीच जाणीव ठेवून कोल्हापूरच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी यापूर्वीपासूनच मोर्चेबांधणी केली होती. अनेकांनी वाहने ठरवून ठेवली होती. कोणत्या वाहनांमधून कोणी-कोणी जायचे. ऐनवेळी वाहने कमी पडली तर पर्यायी वाहनांची सोय करण्यात आली होती. ऐनवेळी पेट्रोल, डिझेलअभावी खोळंबा होऊ नये म्हणून वाहनांच्या टाक्या भरून ठेवल्या होत्या.
कोल्हापूरमध्ये एकदा गर्दी होऊ लागली की, शहरात घुसणे अवघड होणार आहे. रस्ते बंद झाल्यास अडचण येऊ नये, यासाठी तसेच सातारा महामोर्चाचा अनुभव असल्याने जिल्ह्यातील तरुणाई तयारीला लागली होती. सातारा जिल्ह्यातून भगवे फेटे, भगव्या पताका घेऊन हजारोंच्या संख्येने तरुणाई कोल्हापूरच्या दिशेने शुक्रवारी रात्रीच रवाना झाली. (प्रतिनिधी)
बावडामध्ये वाहनतळ
साताऱ्याच्या बाजूने आलेल्या वाहनांसाठी बावड्यात वाहनतळ तयार केले होते. त्याठिकाणी वाहने लावून मोर्चा सुरू झाला त्या ठिकाणापर्यंत चालत जावे लागत होते. हे अंतर सरासरी सहा किलोमीटरच्या घरात होते. तरीही सातारकर न थकता जात होते.
 

Web Title: Kolhapur's Maratha Kranti Morcha is also worth lakhsarkar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.