कोरडेवाडी ग्रामस्थांना मराठा आंदोलनास पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:48 AM2021-02-20T05:48:57+5:302021-02-20T05:48:57+5:30
रामापूर : पाटण येथील तहसीलदार कार्यालयासमोर मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या आठव्या ...
रामापूर : पाटण येथील तहसीलदार कार्यालयासमोर मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या आठव्या दिवशी कोरडेवाडी ग्रामस्थांनी सहभागी होऊन पाठिंबा दिला. यात महिला, मुले, पालक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोरडेवाडी गावात बैठक घेऊन सर्व ग्रामस्थांनी आंदोलनाला पाठिंबा देण्याचा ठराव केला. त्यानुसार सर्व ग्रामस्थांनी पाटण येथे ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी उपस्थिती लावली . या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी विनोद सावंत, तात्या,जाधव, संजय जाधव, संतोष पवार, सयाजी साळुंखे, बाळू साळुंखे, विलास जाधव, विजय साळुंखे, अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. मुलींनी, अनेक ग्रामस्थांनी मनोगते व्यक्त केली.
कोरडेवाडी गावाने एक मोठा आदर्श निर्माण केला आहे. तसेच प्रत्येक गावाने एक दिवस ठरवून आंदोलनाला मोठ्या संख्येने पाठिंबा द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .
फोटो ओळ: पाटण येथील मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या कोरडेवाडी येथील महिला.