कोरोनाग्रस्तांसाठी जिल्ह्यात सर्वाधिक सोय कोरेगाव तालुक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:40 AM2021-05-19T04:40:39+5:302021-05-19T04:40:39+5:30
रुग्णालयात ५४३ रुग्णांवर उपचार; १२७६ जण गृह विलगीकरणामध्ये लोकमत न्यूज नेटवर्क कोरेगाव : कोरोनाविरुद्धच्या लढाईत कोरेगाव तालुक्यात लोकप्रतिनिधी, ...
रुग्णालयात ५४३ रुग्णांवर उपचार; १२७६ जण गृह विलगीकरणामध्ये
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव : कोरोनाविरुद्धच्या लढाईत कोरेगाव तालुक्यात लोकप्रतिनिधी, महसूल प्रशासन, आरोग्य विभाग आणि खासगी वैद्यकीय व्यावसायिक एकत्रित आले असून, त्यांनी जिल्ह्यात एक वेगळा पायंडा पाडला आहे. सद्य:स्थितीत ४ व्हेंटिलेटर बेड्स, २०७ ऑक्सिजन बेड्स, ३२४ साधे बेड्स तालुक्यात उपलब्ध आहेत. केवळ खटाव, माण तालुक्यांसह जिल्ह्यातील अनेक रुग्ण कोरेगाव तालुक्यात उपचार घेत आहेत. सद्य:स्थितीत ५४३ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून, १२७६ जण गृह विलगीकरणामध्ये उपचार घेत आहेत.
आमदार शशिकांत शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी उपजिल्हा रुग्णालयाची मोठी इमारत उभी केली असून, तेथे एक शासकीय कोविड हॉस्पिटल आणि चॅलेंज अकॅडमी येथे कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे, तर आमदार महेश शिंदे यांनी काडसिद्धेश्वर कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे. त्याचबरोबर रेल्वे स्टेशननजीक काडसिद्धेश्वर कोविड हॉस्पिटलची उभारणी केली आहे. ब्रम्हपुरी (रहिमतपूर) व शिवसाई मंगल कार्यालय (वाठार स्टेशन) येथे कोविड हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे.
शासकीय यंत्रणेला खासगी वैद्यकीय व्यावसायिक पाठबळ देत आहेत. पाटील हॉस्पिटल, श्रीरंग नर्सिंग होम, कोरेगाव मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, श्री क्लिनिक व धनंजय हॉस्पिटल, आदी रुग्णालये पूर्ण क्षमतेने कोविड हॉस्पिटल म्हणून कार्यरत आहेत. केवळ खटाव, माण तालुक्यांसह जिल्ह्यातील अनेक रुग्ण कोरेगाव तालुक्यात उपचार घेत आहेत. महसूल प्रशासन, आरोग्य विभाग आणि लोकप्रतिनिधींचा समन्वय त्याचबरोबर नागरिकांची जागरूकता यामुळे कोरेगाव तालुका लवकरात लवकर पूर्ण कोरोनामुक्त होईल, असा विश्वास वाटतो.