मायणीत कोविड सेंटर सुरू करणार : माळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:38 AM2021-05-14T04:38:18+5:302021-05-14T04:38:18+5:30
मायणी : ‘मायणी व मायणी परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे ...
मायणी : ‘मायणी व मायणी परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे येथील यशवंत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे,’ अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष शंकर माळी यांनी दिली.
माळी म्हणाले, ‘सध्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्या योग्य प्रमाणात उपचार होताना दिसत नाही. मायणीत कोविड सेंटर आहे. परंतु स्थानिक लोकांना त्याचा फायदा म्हणावा तसा होताना दिसत नाही. रुग्णाचे उपचाराअभावी होणारे हाल लक्षात घेऊन, शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कोविड सेंटर येत्या दोन दिवसांत तातडीने सुरू करत आहे. तसेच याठिकाणी अल्पदरात रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.
या कोविड केअर सेंटरमध्ये भारतीय खासगी वैद्यकीय सेवा देणारे डॉ. सुशांत देशमुख, डॉ. उदय माळी, डॉ. नीलेश देशमुख, डॉ. सोमनाथ कुंभार ही टीम विनामोबदला कोविड रुग्णांची सेवा करणार असून, या सेंटरसाठी लागणाऱ्या सर्व नियमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.