बामणोली आरोग्य केंद्रात लवकरच कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:42 AM2021-05-20T04:42:28+5:302021-05-20T04:42:28+5:30

सातारा : जावळी तालुक्यातील कसबे-बामणोली आणि परिसरातील दुर्गम, डोंगराळ भागातील कोरोनाबाधित रुग्णांना बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपचाराची सुविधा उपलब्ध ...

Kovid Center soon at Bamnoli Health Center | बामणोली आरोग्य केंद्रात लवकरच कोविड सेंटर

बामणोली आरोग्य केंद्रात लवकरच कोविड सेंटर

Next

सातारा : जावळी तालुक्यातील कसबे-बामणोली आणि परिसरातील दुर्गम, डोंगराळ भागातील कोरोनाबाधित रुग्णांना बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपचाराची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदार फंडातून निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या सूचनेनुसार आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली असून, बामणोली येथे कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी चार लाख ८२ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये बामणोली आरोग्य केंद्रामध्ये कोविड केअर सेंटर उभारणीस प्रारंभ होणार आहे.

कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, सर्वत्र हाहाकार उडाला आहे. सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांना उपचारासाठी बेड मिळणे अवघड झाले असून, उपचाराविना रुग्ण दगावत आहेत. कसबे बामणोली हा जावली तालुक्यातील अतिदुर्गम आणि डोंगराळ भाग आहे. बामणोली परिसरातील अनेक गावे दुर्गम असल्याने या भागातील कोरोनाबाधित रुग्णांच्या सोयीसाठी बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येच उपचाराची सोय व्हावी, यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे आग्रही होते. शासनाकडे निधी नसेल तर यासाठी लागणारा निधी आमदार फंडातून उपलब्ध करून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी ३० एप्रिल २०२१ रोजी जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना लेखीपत्र पाठवून बामणोली आरोग्य केंद्रामध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करून त्वरित जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे पाठवण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच त्यांनी जिल्हा नियोजन अधिकारी यांनाही बामणोली येथे कोविड केअर सेंटर सुरू करावे आणि त्यासाठी आमदार फंडातून निधी घ्यावा, अशी सूचना केली होती.

(चौकट)

बामणोलीला रुग्णवाहिका; सोमर्डीला वैद्यकीय पथक द्या

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच कोरोना आढावा बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते. या बैठकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका नसल्याने मोठी गैरसोय होत असल्याचे सांगून बामणोलीसाठी कायमस्वरूपी रुग्णवाहिका देण्याची मागणी केली. तसेच सोमर्डी येथे रुग्ण तपासणी आणि लसीकरण करण्यासाठी पूर्णवेळ वैद्यकीय पथक नेमा, अशी मागणीही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. पालकमंत्र्यांनी या दोन्ही मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

Web Title: Kovid Center soon at Bamnoli Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.