कोविड सेंटर आध्यात्मिक प्रवचन ठरतेय मानसिक आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:40 AM2021-05-09T04:40:23+5:302021-05-09T04:40:23+5:30
रामापूर : देशात, राज्यात कोरोनाच्या महामारीने हाहाकार माजविला आहे. पाटण तालुक्यात देखील कोरोना बाधिताची संख्या पाच हजारांच्या घरात ...
रामापूर
: देशात, राज्यात कोरोनाच्या महामारीने हाहाकार माजविला आहे. पाटण तालुक्यात देखील कोरोना बाधिताची संख्या पाच हजारांच्या घरात पोहोचली आहे, ही कोरोना बाधितांची संख्या कमी करण्यासाठी आरोग्य आणि शासकीय यंत्रणा काम करते आहे. लोकांचे मनोबल वाढवत आहे.
कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आल्यानंतर बाधित मानसिकदृष्ट्या खचत आहेत. त्यांना मानसिक आधाराची गरज आहे, हेच ओळखून पाटणचे तहसीलदार यांनी पाटण येथील कोविड सेंटरमध्ये आध्यात्मिक प्रवचन देऊन कोरोनाबाधितांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा या प्रयत्नांना नक्कीच यश येत असून, कोरोना बाधितांना मानसिक आधार मिळत आहे.
पाटण तालुक्यात मार्च आणि एप्रिलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हा झपाड्याने वाढत आहे. या महिन्यात पाटण शहराबाहेर तालुक्यातील गावचे गाव बाधित होत आहे. पण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल मिळताच कोरोनाबाधित मानसिकदृष्ट्या खचत आहेत, त्यांना खरी गरज असते ती मानसिक आधाराची. कारण कोरोनाबाधित झाल्यानंतर काही ठिकाणी नातेसुद्धा विसरत आहे, त्यावेळी त्यांना मानसिक आधार कामी येतो म्हणून पाटणचे तहसीलदार योगेश टोम्पे यांनी पाटण येथील कोविड सेंटरमध्ये आध्यात्मिक प्रवचनाच्या माध्यमातून बाधितांना मानसिक आधार देत आहेत. या कामात त्यांना यश देखील येत आहे. त्यांच्या या कामाचे कौतुक सर्वच स्तरातून होत आहे. त्यामुळे तालुक्यातून या ठिकाणी आध्यात्मिक प्रवचन देण्यासाठी लोक पुढे येत आहेत.
०८रामापूर
पाटण येथील कोविड सेंटरमध्ये संजय महाराज कवर यांनी प्रवचनसेवा दिली.