कोविड सेंटरमुळे रुग्णांची फरफट थांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:39 AM2021-05-09T04:39:56+5:302021-05-09T04:39:56+5:30
रहिमतपूर : ‘कोरेगाव तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे सर्व सोईंनी युक्त कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. यामुळे रहिमतपूर परिसरातील बाधित रुग्णांची ...
रहिमतपूर : ‘कोरेगाव तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे सर्व सोईंनी युक्त कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. यामुळे रहिमतपूर परिसरातील बाधित रुग्णांची उपचार व बेडअभावी होणारी फरफट थांबणार आहे,’ असे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
ब्रह्मपुरी येथील श्री संत गाडगे महाराज आश्रम शाळेच्या इमारतीमध्ये रहिमतपूर नगरपरिषद व तालुका प्रशासनाच्या माध्यमातून कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजी क्षीरसागर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा चित्रालेखा माने-कदम, नगराध्यक्ष आनंदा कोरे, उपाध्यक्ष सुरेखा माने, तहसीलदार अमोल कदम, पाणीपुरवठा सभापती चांदभाई आतार, मधुसूदन मोहिते-पाटील, माजी नगराध्यक्ष वासुदेव माने, अविनाश माने आदी उपस्थित होते.
सुनील माने म्हणाले, ‘कोविड सेंटरच्या माध्यमातून रहिमतपूर परिसरातील रुग्णांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून केला आहे. नागरिकांनी जागतिक महामारीच्या परिस्थितीत स्वत:सह कुटुंबीयांची काळजी घ्यावी. शासकीय सूचनांचे काटेकोर पालन केल्यास निश्चितपणे आपल्याला कोरोनावर यशस्वी मात करता येईल.’
०८रहिमतपूर
फोटो : ब्रह्मपुरी, ता. कोरेगाव येथे कोविड सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. (छाया : जयदीप जाधव )