पाटण एज्युकेशन ट्रस्टकडून कोविड आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:41 AM2021-05-06T04:41:33+5:302021-05-06T04:41:33+5:30
रामापूर : माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व सत्यजितसिंह पाटणकर यांच्या माध्यमातून पाटण एज्युकेशनल अँड डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...
रामापूर : माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व सत्यजितसिंह पाटणकर यांच्या माध्यमातून पाटण एज्युकेशनल अँड डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाटण येथील कोरोना केअर सेंटरमधील बाधित रुग्णांच्या औषधोपचारार्थ २५ हजारांची आर्थिक मदत पाटणचे तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
पाटण तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता कोरोनाला थोपविण्यासाठी महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा प्रशासन जोमाने काम करते आहे. त्याच पद्धतीने पाटण शहरातील सामाजिक बांधव, कार्यकर्तेही आपापल्या परीने आपले सामाजिक कर्तव्य, सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मदत वस्तुरूपी सहकार्य करत आहेत. त्यामुळे बाधितांबरोबरच कुटुंबीयांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे.
पाटण विधानसभा मतदारसंघातील कोरोनाबाधित नागरिकांसाठी तालुक्यात यापूर्वी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व सत्यजितसिंह पाटणकर यांच्या माध्यमातून पाटण येथील कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले. त्या कोरोना सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची निर्मिती करण्यात आली. त्यानंतरही ऑक्सिजन सिलिंडर अपुरे पडत असल्याने पुन्हा ऑक्सिजन सिलिंडरसाठी सव्वा लाखाच्या निधीची मदत केली.