छत्रपती शाहू जिल्हा क्रीडासंकुलात कोविड हॉस्पिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:38 AM2021-04-17T04:38:55+5:302021-04-17T04:38:55+5:30

सातारा : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडासंकुलात ७८ बेडची सुविधा उपलब्ध केली जाणार ...

Kovid Hospital in Chhatrapati Shahu District Sports Complex | छत्रपती शाहू जिल्हा क्रीडासंकुलात कोविड हॉस्पिटल

छत्रपती शाहू जिल्हा क्रीडासंकुलात कोविड हॉस्पिटल

Next

सातारा : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडासंकुलात ७८ बेडची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्याची पाहणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली.

तत्पूर्वी प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजना व रुग्णांवरील उपचारांबाबत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आढावा घेतला.

या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, नगर प्रशासनाधिकारी अभिजित बापट यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीमध्ये ऑक्सिजन बेड तसेच आयसीयू बेड वाढविण्याच्या सूचना करून पालकमंत्री पाटील यांनी जिल्ह्यामध्ये रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्धतेची माहिती घेऊन ब्रेक दि चेनअंतर्गत जे निर्बंध घातले आहेत, त्याची जिल्ह्यात कडक अंमलबजावणी करा, अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत केल्या.

जिल्हा क्रीडासंकुलात उभारण्यात येणाऱ्या कोविड सेंटरच्या कामाची पालकमंत्र्यांकडून पाहणी करण्यात आली. वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता कोणताही रुग्ण बेडपासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्हा क्रीडासंकुलात नव्याने कोविड सेंटर उभारण्याचे काम सुरू असून या कामाची पाहणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केली.

ही असेल सुविधा

या सेंटरमध्ये ७८ ऑक्सिजन बेड असणार आहेत; तर जिल्हा कोविड सेंटरमध्ये आणखी २० आयसीयू बेडची नव्याने निर्मिती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढण्यावर शासनाचा भर असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी पाहणीदरम्यान सांगितले.

फोटो ओळ : सातारा येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडासंकुलात नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या कोविड हॉस्पिटलची पाणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी शुक्रवारी केली. याप्रसंगी शेखर सिंह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक गौडा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर दराडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: Kovid Hospital in Chhatrapati Shahu District Sports Complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.