कोविड रुग्णालयामुळे हजारोंचे प्राण वाचले : महेश शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:31 AM2021-01-04T04:31:46+5:302021-01-04T04:31:46+5:30

कोरेगाव : ‘कोरोनामुळे अनेकांचे जीव जात असल्याचे पाहून मन विचलित होत होते, त्यांच्यासाठी आपण पुढाकार घेऊन कोविड रुग्णालय सुरू ...

Kovid hospital saves thousands of lives: Mahesh Shinde | कोविड रुग्णालयामुळे हजारोंचे प्राण वाचले : महेश शिंदे

कोविड रुग्णालयामुळे हजारोंचे प्राण वाचले : महेश शिंदे

Next

कोरेगाव : ‘कोरोनामुळे अनेकांचे जीव जात असल्याचे पाहून मन विचलित होत होते, त्यांच्यासाठी आपण पुढाकार घेऊन कोविड रुग्णालय सुरू केले पाहिजे, यासाठी निर्धार केला. कुटुंबीयांसह सहकारी मित्रांनी जिवावर उदार होऊन काम केल्यानेच आज हजारोजणांचे प्राण आपण वाचवू शकलो आहे. ज्यांनी अहोरात्र कष्ट घेतले, त्यांना कोविड योद्धा सन्मान दिला जात आहे,’ असे प्रतिपादन आमदार महेश शिंदे यांनी केले.

शहरातील प्रभाग क्र. ७, ८ व ९ मधील कोरोना योद्धयांचा सन्मान आ. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर फत्तेसिंह बर्गे, उदयसिंह बर्गे, प्रतापराव मोहिते, चंद्रशेखर बर्गे, प्रा. अनिल बोधे, प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, राहुल बर्गे, नगरसेविका शुभांगी बर्गे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राजाभाऊ बर्गे यांनी स्वागत केले. संतोष नलावडे यांनी प्रास्ताविक केले. शुभांगी बर्गे, श्रीकांत बर्गे व सागर दोशी यांनी सूत्रसंचालन केले. राहुल बर्गे यांनी आभार मानले. (वा.प्र.)

फोटो नेम : ०३कोरेगाव

फोटो ओळ : नीलेश बर्गे यांना कोविड योद्धा सन्मानपत्र प्रदान करताना आ. महेश शिंदे. शेजारी राजाभाऊ बर्गे, राहुल बर्गे, उदयसिंह बर्गे, चंद्रशेखर बर्गे, आदी उपस्थित होते.

Web Title: Kovid hospital saves thousands of lives: Mahesh Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.