कोयना धरण साठ्याने पार केला १०० टीएमसीचा टप्पा, ९५ टक्क्यांवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 11:58 AM2020-08-31T11:58:02+5:302020-08-31T11:59:30+5:30

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमीच असून रविवारी कोयनेला २५, नवजा येथे ४९ आणि महाबळेश्वरला ६५ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात १०० टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. टक्केवारी ९५.४८ झाली असून धरण भरण्याकडे वाटचाल करु लागले आहे.

Koyna Dam stocks crossed 100 TMC stage, 95 per cent water | कोयना धरण साठ्याने पार केला १०० टीएमसीचा टप्पा, ९५ टक्क्यांवर पाणी

कोयना धरण साठ्याने पार केला १०० टीएमसीचा टप्पा, ९५ टक्क्यांवर पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देकोयना धरण साठ्याने पार केला १०० टीएमसीचा टप्पा, ९५ टक्क्यांवर पाणी पावसाचा जोर कमी; नवजाला ४९ तर महाबळेश्वरला ६५ मिलिमीटर

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमीच असून रविवारी सकाळपर्यंत कोयनेला २५, नवजा येथे ४९ आणि महाबळेश्वरला ६५ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात १०० टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. टक्केवारी ९५.४८ झाली असून धरण भरण्याकडे वाटचाल करु लागले आहे.

सातारा शहरासह पश्चिम भागात एक महिन्यापासून पाऊस सुरू झाला आहे. जून महिन्यानंतर आॅगस्ट महिन्यात पावसाने दमदार सुरूवात केली.

सुरूवातीला कोयनानगर, कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर भागात दमदार पाऊस कोसळला. तसेच धरण क्षेत्राही पावसाने धुवाँधार हजेरी लावली. त्यामुळे कोयना, तारळी, धोम, उरमोडी, बलकवडी, कण्हेर यासारख्या प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. झपाट्याने धरणे भरु लागली. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सर्वच धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला.

सध्यस्थितीत पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झालेला आहे. कोयनानगर, नवजा, महाबळेश्वर, कास, बामणोली, तापोळा भागात पाऊस होत असलातरी प्रमाण कमी आहे. रविवारी सकाळपर्यंत कोयनेला २५ आणि यावर्षी आतापर्यंत ४११९ मिलिमीटर पाऊस झाला. तर नवजाला सकाळपर्यंत ४९ व जूनपासून आतापर्यंत ४७२८ आणि महाबळेश्वरला ६५ व यावर्षी आतापर्यंत ४६०९ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.

पूर्व भागात पावसाची उघडीप...

सातारा शहरात मागील काही दिवसांपासून पावसाची उघडीप आहे. रविवारीही ढगाळ वातावरण होते. तसेच वारे वाहत होते. तर पूर्व भागातही गेल्या १५ दिवसांपासून पावसाची उघडीप कायम आहे. दुष्काळी भागातील तलाव भरण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.
 

 

Web Title: Koyna Dam stocks crossed 100 TMC stage, 95 per cent water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.