कोल्हापूर ते मुंबई प्रवास करणाऱ्यांना विविध अडचणी-- लोहमार्गावर तांत्रिक बिघाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 07:11 PM2020-01-21T19:11:23+5:302020-01-21T19:13:17+5:30
मुंबईहून सकाळी सुटणारी कोयना एक्स्प्रेस बंद करण्यात आल्याने मुंबईहून कोल्हापूरकडे येणा-या प्रवाशांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. कोयना एक्स्प्रेस ही कोल्हापूरकडे जाणारी महत्त्वाची व दिवसा जाणारी एकमेव गाडी असल्याने प्रवाशांची या गाडीला प्रथम पसंती असते. मात्र,
लोणंद : कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस गेल्या दोन महिन्यांपासून पुण्यापर्यंतच धावत आहे. लोहमार्ग दुरुस्तीचे काम आणखी काही दिवस चालणार असल्याने कोयना एक्स्प्रेसचे वेळापत्रक पुन्हा रुळावर येण्यासाठी प्रवाशांना वाट पाहवी लागणार आहे. त्यामुळे मुंबई ते कोल्हापूर प्रवास करणाºया प्रवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
अतिवृष्टीमुळे मंकी हिल ते कर्जत लोहमार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईहून सकाळी सुटणारी कोयना एक्स्प्रेस बंद करण्यात आल्याने मुंबईहून कोल्हापूरकडे येणाºया प्रवाशांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. कोयना एक्स्प्रेस ही कोल्हापूरकडे जाणारी महत्त्वाची व दिवसा जाणारी एकमेव गाडी असल्याने प्रवाशांची या गाडीला प्रथम पसंती असते. मात्र, मध्य रेल्वेकडून मंकी हिल ते कर्जत या घाटक्षेत्रात विविध तांत्रिक तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे पुढील दहा दिवस अजूनही सुरू राहणार असल्याने या कालावधीत अनेक एक्स्प्रेससह पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस पुण्यातूनच सोडण्यात येणार आहे, अशी माहिती पुन्हा रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यातही रेल्वेकडून मंकी हिल येथे दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आली होती. त्यावेळीही काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मुसळधार पावसामुळे घाट क्षेत्रातील रेल्वेमार्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यावेळी भर पावसातच रेल्वेकडून दुरुस्तीची कामे करण्यात आली होती. पण या भागात आणखी काही कामे करणे आवश्यक असून, पुढील दहा दिवस ही कामे सुरू राहणार आहेत.
प्रत्येकवेळी मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस अंशत: रद्द करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. मुंबईला जाणासाठी व मुंबईहून येण्यासाठी प्रवाशांच्या पसंतीची असणारी कोयना एक्स्प्रेसचे वेळापत्रक पुन्हा केव्हा रुळावर येईल याकडे प्रवाशांच्या नजरा लागल्या आहेत.