‘कोयना’तून ३२१८ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:29 AM2021-06-02T04:29:32+5:302021-06-02T04:29:32+5:30

कोयनानगर : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाच्या सन २०२१-२२ च्या तांत्रिक वर्षास मंगळवार, दि. १ पासून सुरुवात झाली. गतवर्षीच्या ...

Koyna generates 3218 million units of electricity | ‘कोयना’तून ३२१८ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती

‘कोयना’तून ३२१८ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती

Next

कोयनानगर : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाच्या सन २०२१-२२ च्या तांत्रिक वर्षास मंगळवार, दि. १ पासून सुरुवात झाली. गतवर्षीच्या तांत्रिक वर्षात कोयना जलविद्युत प्रकल्पातुन ३ हजार २१८ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली असून सध्या धरणात २९.२७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

कोयना धरणाचे पाणी वाटप कृष्णा लवादानुसार १ जून ते ३१ मे या कालावधीतचे तांत्रिक वर्षाचे कामकाज चालते. यामधे ६७.५० टीएमसी पाणी वीज निर्मितीसाठी व उर्वरित पाणी सिंचनासाठी वापरले जाते. सन २०२०-२१ या तांत्रिक वर्षात सुरुवातीला १ जूनला धरणात ३४.१८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. त्यानंतर वर्षभरात पाऊस तसेच ओढे, नाल्यातुन तब्बल १३३. ८८ टीएमसी पाण्याची आवक झाली. पूरस्थितीत सहा वक्रदरवाजे व पायथा वीजगृहातुन २८.२२ टीएमसी पाणी पूर्वेला नदीपात्रात सोडण्यात आले तर पश्चिमेला वीज निर्मितीसाठी ६७.५७ टीएमसी पाण्याचा वापर करीत ३०५४.८७ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती केली गेली. पायथा वीजगृहातुन सिंचन व पूरकाळात सोडलेल्या ३७.०६ टीएमसी पाण्यापासुन १६३.३९ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली. २०२०-२१ या तांत्रिक वर्षात विद्युत निर्मितीच्या चार टप्प्यातून व पायथा वीजगृहातून एकूण ३२१८.२६ दशलक्ष युनिटची वीज निर्मिती कोयना जलविद्युत प्रकल्पातुन झाली आहे .

सन २०२०-२१ या तांत्रिक वर्षात सिंचनासाठी ३२.८४ टीएमसी, नदी विमोचकातुन २.३१ टीएमसी, पुर काळात सहा वक्र दरवाजातून २३.९९ टीएमसी व पायथा वीजगृहातुन ४.२२ टीएमसी पाणी कोयना नदीत सोडले होते. गळती ०.०२ टीएमसी असे एकुण ६३.४० टीएमसी पाणी पूर्वेला कोयना नदीत सोडले आहे तर पश्चिमेला वीज निर्मितीसाठी ६७.५७ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. बाष्पीभवनाव्दारे ७.८५ टीएमसी पाणी खर्च झाले आहे.

- चौकट

दीड महिना पुरेल एवढा पाणीसाठा

साठवण क्षमता १०५ टीएमसी असलेल्या कोयना धरणात सध्या २९.२७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असुन मृतसाठा ५.१२ टीएमसी वगळता २४.१५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षी हाच पाणीसाठा ३४.१८ टीएमसी होता. गतवर्षीच्या तांत्रिक वर्षाची तुलना केली असता सध्याचा पाणीसाठा कमी आहे. मात्र, सध्या पायथा वीजगृहाचे एकच युनिट सुरू आहे. त्यामधून १ हजार ५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. हीच मागणी कायम राहीली तर सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे दीड महिना पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.

Web Title: Koyna generates 3218 million units of electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.