जेईई मेन्स पेरीक्षेत कोयना पॅटर्नचे घवघवीत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:38 AM2021-03-16T04:38:08+5:302021-03-16T04:38:08+5:30
रामापूर : पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयात विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे २०२१ ...
रामापूर : पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयात विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परीक्षेत कोयना पॅटर्नने घवघवीत यश मिळविले आहे. नऊ विद्यार्थ्यांनी यात बाजी मारली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी सुविधा मिळाव्यात, त्यांचे उत्तमरित्या भविष्य घडून जीवनात ते यशस्वी व्हावेत, या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा देता याव्यात या उदात्त हेतूने कोयना शिक्षण संस्थेने बाळासाहेब देसाई महाविद्यालय पाटणमध्ये कोयना पॅटर्न हा महत्त्वाकांशी उपक्रम सुरू केला आहे आणि याचेच फलित म्हणजे फेब्रुवारी २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परीक्षेत कोयना पॅटर्नच्या नऊ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये ई.डब्लू.एस. या प्रवर्गात सौरभ देसाई (९२.६४%), विवेक कदम (८५.६१%), साक्षी जाईगडे (८०.०९), गणेश केंडे (७१.०६%), तसेच एस.सी. प्रवर्गात वर्तिका सोनावले (८०.३०%), वृक्षिता सोनावले (७६.५४%), तर ओ.बी.सी. प्रवर्गात रूपाली आग्रे (८३.७५%), क्षितिजा पवार (८२.४९%) व शंतनू सुतार (८१.६०%) असे गुण प्राप्त केले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे पाटण पंचायतीचे माजी सभापती सत्यजित पाटणकर, कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, जनरल सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर, सदस्य याज्ञसेन पाटणकर, संजीव चव्हाण, प्राचार्य डॉ. एस. डी. पवार कोयना पॅटर्नचे समन्वयक यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. (वा.प्र.)