कोयनेच्या पायथा वीजगृहातून पाणी सोडणे सुरूच, २१०० क्युसेक विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 02:36 PM2018-08-07T14:36:00+5:302018-08-07T14:39:11+5:30
कोयना धरणात पाण्याची आवक होत असल्याने पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. तर धरणात मंगळवारी सकाळपर्यंत ९२.५८ टीएमसी इतका साठा झाला होता. दरम्यान जिल्ह्यातील धोम, बलकवडी, उरमोडी, तारळी या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.
सातारा : कोयना धरणात पाण्याची आवक होत असल्याने पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. तर धरणात मंगळवारी सकाळपर्यंत ९२.५८ टीएमसी इतका साठा झाला होता. दरम्यान जिल्ह्यातील धोम, बलकवडी, उरमोडी, तारळी या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत अनेक दिवस पाऊस पडला. त्यानंतर सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. तरीही आवक होत असल्याने प्रमुख धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. मंगळवारी सकाळपर्यंत कोयना धरण परिसरात ३५ मिलीमीटर पाऊस झाला होता.
धरणात ९२.५८ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणात १२१४६ क्युसेक पाण्याची आवक होत असून, पायथा वीजगृहातून पाणी सोडण्यात येत आहे.
मंगळवारी सकाळपर्यंत धोम धरणात ११.६७ टीएमसी पाणीसाठा होता. तर कण्हेरमध्ये ८.६३, बलकवडी ३.५९ तर तारळी धरणात ४.९८ टीएमसी साठा होता. तारळी धरणातून १४७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये
धोम ०३ (४९१)
कोयना ३५ (३८२२)
बलकवडी ०७ (१९०५)
कण्हेर ०० (५८२)
उरमोडी ०२ (९०६)
तारळी ०६ (१६७०)