कोयनेत ९६ टीएमसी पाणीसाठा, २१०० क्युसेक विसर्ग सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 01:49 PM2018-08-11T13:49:33+5:302018-08-11T13:51:57+5:30
कोयना धरणात पाण्याची आवक होत असल्याने पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. धरणात शनिवारी सकाळपर्यंत ९५.७९ टीएमसी इतका साठा झाला होता. कोयना धरण भरण्यासाठी आता १० टीएमसी पाणीसाठ्याची आवश्यकता आहे.
सातारा : कोयना धरणात पाण्याची आवक होत असल्याने पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. धरणात शनिवारी सकाळपर्यंत ९५.७९ टीएमसी इतका साठा झाला होता. कोयना धरण भरण्यासाठी आता १० टीएमसी पाणीसाठ्याची आवश्यकता आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत अनेक दिवस पाऊस पडला. त्यानंतर सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. तरीही आवक होत असल्याने प्रमुख धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत.
शनिवारी सकाळपर्यंत कोयना धरण परिसरात २३ मिलीमीटर पाऊस झाला होता. धरणात ९५.७९ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरणात पाण्याची आवक होत असून, पायथा वीजगृहातून पाणी सोडण्यात येत आहे.
शनिवारी सकाळपर्यंत धोम धरणात ११.९१ टीएमसी पाणीसाठा होता. तर कण्हेरमध्ये ८.८८, बलकवडी ३.६६ तर तारळी धरणात ४.९८ टीएमसी साठा होता. तारळी धरणातून १४७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये
धोम ०३ (४९६)
कोयना २३ (३९५६)
बलकवडी १७ (१९५९)
कण्हेर ०१ (७८७)
उरमोडी ०७ (९२१)
तारळी ०९ (१७०३)