क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:46 AM2021-08-18T04:46:07+5:302021-08-18T04:46:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : महिलांनी शिक्षण घेतल्यामुळे त्या विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करत आहेत. स्त्री शिक्षणासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : महिलांनी शिक्षण घेतल्यामुळे त्या विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करत आहेत. स्त्री शिक्षणासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुढाकार घेतला. सावित्रीबाई फुले यांचे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन दीप्ती भारद्वाज यांनी केले.
नायगाव, ता. खंडाळा येथील सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी जाऊन भाजप राष्ट्रीय महिला मोर्चाच्या सरचिटणीस दीप्ती भारद्वाज, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील व पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. यावेळी दीप्ती भारद्वाज म्हणाल्या, ‘महिलांनी अधिक कार्यक्षम होऊन मिळालेल्या संधीचा लाभ घेत कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श पुढे नेऊन धडाडीने कार्य करावे.
सुवर्णा पाटील म्हणाल्या, ‘महिलांना राजकारणात आरक्षणाप्रमाणे समान सन्मान व वागणूक मिळावी अशी मागणी असून ती राष्ट्रीय स्तरावर पोहोचवावी. सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस मनीषा पांडे यांनी केले. जिल्हा सरचिटणीस वनिता शिर्के यांनी आभार मानले. यावेळी सुजाता कोल्हटकर, रिना भणगे, निर्मळ पाटील, ज्योती गांधी, सायली भंडारी, मीना बर्गे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
फोटो आहे :
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करताना दीप्ती भारद्वाज, सुवर्णा पाटील व इतर मान्यवर.
...............