कृषिकन्येचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:45 AM2021-09-14T04:45:48+5:302021-09-14T04:45:48+5:30
पक्ष्याला जीवदान सातारा : वाढे चौकातील उड्डाणपुलावर चारचाकी वाहनाला धडकून जखमी झालेल्या भैरी ससाणा या पक्ष्याला संग्राम भंडारे या ...
पक्ष्याला जीवदान
सातारा : वाढे चौकातील उड्डाणपुलावर चारचाकी वाहनाला धडकून जखमी झालेल्या भैरी ससाणा या पक्ष्याला संग्राम भंडारे या युवकाने जीवदान देऊन वनखात्याच्या ताब्यात दिले. उड्डाणपुलावर हवेत मुक्तपणे संचार करणाऱ्या भैरी ससाणा पक्ष्याला एका अज्ञात वाहनाची धडक बसून तो पक्षी रस्त्यावर पडल्याचे निदर्शनास आले.
महिलांचे लसीकरण
सातारा : माणदेशी फाउंडेशनच्या वतीने फत्यापूर ता. सातारा येथील महिलांना मोफत लसीकरण करण्यात आले. गावातील एकूण १०० महिलांना लस देण्यात आली. यासाठी श्रीकांत ताडे यांनी प्रयत्न केले. यावेळी माणदेशीच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, सरपंच अमोल घाडगे, उपसरपंच समाधान घाडगे, सीईओ रेखा कुलकर्णी, वनिता शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सोनल भुजबळ यांनी पीएच.डी
सातारा : कोंडवे ता. सातारा येथील सोनल भुजबळ हिने अमेरिकेतील परड्यू विद्यापीठातील ‘इंडस्ट्रीअल ॲण्ड फिजिकल फार्मसी’ या विषयात पीएच.डी मिळाली. तिला शिक्षिका डॉ. लीन टेलर, डॉ. झाऊँ व शीतल सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. जगप्रसिद्ध लस व निर्माता कंपनी असणाऱ्या फायझर या कंपनीच्या बोस्टन कार्यालयात सोनलची संशोधक शास्त्रज्ञ म्हणून नियुक्तीही झाली आहे.
कृषी पदवीधरांची मदत
सातारा : तरडगाव येथील ग्रामसेवक श्रीकांत क्षीरसागर यांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना कृषी पदवीधरांनी आर्थिक मदतीचा हात देऊन मैत्री जपली आहे. त्यामुळे कुटुंबीयांना धीर मिळाला आहे. या सर्वांनी मिळून ॲग्रो व्हिजन ही संस्थाही काढली या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे.