कृष्णा कारखाना १ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:32 AM2021-01-14T04:32:32+5:302021-01-14T04:32:32+5:30
पहिल्या इथेनॉल टँकरचे विधिवत पूजन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करून, टँकर ऑइल कंपन्यांकडे रवाना करण्यात आला. यंदा कृष्णा ...
पहिल्या इथेनॉल टँकरचे विधिवत पूजन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करून, टँकर ऑइल कंपन्यांकडे रवाना करण्यात आला. यंदा कृष्णा कारखान्याने १ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यावेळी संचालक पांडुरंग होनमाने, सुजीत मोरे, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, मनोज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या दूरदृष्टीतून कारखाना कार्यस्थळावर शेतकऱ्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून साखरेसह पूरक उद्योगांची जोड देऊन सभासद शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न कारखाना व्यवस्थापन करत आहे. केंद्र सरकारने इथेनॉलबाबत घेतलेले सकारात्मक धोरण, इथेनॉलला मिळणारा योग्य दर लक्षात घेऊन, कृष्णा सहकारी साखर कारखान्याने बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती सुरू केली. गतवर्षी २०२० साली कारखान्याने बी हेवी मोलॅसिसपासून ५० लाख लिटर इथेनॉल उत्पादन व विक्री केली. तसेच यावर्षी १ कोटी लिटर्स इथेनॉल उत्पादन करून त्याची ऑइल कंपन्यांना विक्री करणार आहे.
कारखान्याचे जनरल मॅनेजर प्रसाद राक्षे, असि. जनरल मॅनेजर डिस्टिलरी प्रतापसिंह नलवडे, फायनान्स मॅनेजर चंद्रकांत मिसाळ, को-जनरेशन मॅनेजर गिरीश इस्लामपूरकर, ऊस विकास अधिकारी पंकज पाटील, डी. व्ही. कुंभार, कामगार कल्याण अधिकारी अरुण पाटील, पर्यावरण अधिकारी सुयोग खानविलकर, वैद्यकीय अधिकारी हर्षल निकम आदी उपस्थित होते.
- चौकट
इथेनॉल प्रकल्पाची गरुडभरारी...
डॉ. सुरेश भोसले यांनी सन २००३ मध्ये २० हजार लिटर प्रतिदिन क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प उभारला व यशस्वीपणे चालविला. त्यानंतर २०१६ साली या प्रकल्पाचे आधुनिकीकरण करून ६० हजार लिटर प्रतिदिन क्षमतेच्या एमएसडीएच या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इथेनॉल प्रकल्पाची उभारणी केली. सन २०२० साली या प्रकल्पाची उत्पादन क्षमता ६० हजार लिटर प्रतिदिन वरून, ७८ हजार लिटर प्रतिदिन एवढी करण्यात आली आहे.
फोटो : १३केआरडी०५
कॅप्शन : रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथील कृष्णा कारखाना कार्यस्थळावर बी हेव्ही मोलॅसिसपासून उत्पादित इथेनॉलच्या पहिल्या टँकरचे पूजन झाले. यावेळी डॉ. सुरेश भोसले, संचालक पांडुरंग होनमाने, सुजीत मोरे, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, मनोज पाटील आदी उपस्थित होते.