सभासदांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच कृष्णा अग्रस्थानी - भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:48 AM2021-06-09T04:48:49+5:302021-06-09T04:48:49+5:30

कराड : चांगल्या विचारांना साथ देण्याची परंपरा इथल्या लोकांची आहे. शेणोली गावाने नेहमीच कारखान्याच्या वाटचालीत मोठे योगदान दिले आहे. ...

Krishna is in the forefront - Bhosle only because of the faith shown by the members | सभासदांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच कृष्णा अग्रस्थानी - भोसले

सभासदांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच कृष्णा अग्रस्थानी - भोसले

Next

कराड :

चांगल्या विचारांना साथ देण्याची परंपरा इथल्या लोकांची आहे. शेणोली गावाने नेहमीच कारखान्याच्या वाटचालीत मोठे योगदान दिले आहे. सभासदांनी दाखवलेल्या याच विश्वासामुळे कृष्णा कारखाना साखर कारखानदारीत अग्रेसर आहे, असे प्रतिपादन जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे नेते आणि कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केले.

शेणोली (ता. कराड) येथे सहकार पॅनेलच्या प्रचार दौऱ्यावेळी ते बोलत होते. या वेळी सहकार पॅनेलचे उमेदवार बाजीराव निकम, बाळासाहेब निकम, पैलवान आनंदराव मोहिते, सरपंच विक्रम कणसे यांच्यासह गावातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

डॉ. भोसले म्हणाले, सहा वर्षांपूर्वी कृष्णाकाठच्या सुज्ञ सभासदांनी मोठ्या विश्वासाने आमच्या हातात सत्तेची सूत्रे दिली. हा विश्वास सार्थ ठरण्यासाठी आमच्या संचालक मंडळाने सर्वाधिक ऊसदर, मोफत साखर, कारखान्यात आधुनिकता, ऊसविकास योजना इत्यादीसारख्या नावीन्यपूर्ण योजना राबवत, कारभारात पारदर्शकता व गतिमानता आणली. सभासदांचे हित डोळ्यांसमोर ठेवून आम्ही कारखान्यात कारभार केला.

वास्तविक कारखान्यात स्थिरता असेल, तर कारखाना उत्कृष्टपणे चालतो. त्यामुळे कारखाना चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी राजकारण बाजूला ठेऊन काम करण्याची गरज आहे. आम्ही कारखान्यात प्रगती करत पुढे चाललो आहे. येत्या काळातही गाळप क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन करत आहे. कारखाना साखर निर्मितीबरोबरच इथेनॉल निर्मिती करत आहे. या इथेनॉल निर्मिती प्रकल्पातून उच्च दर्जाचे इथेनॉल उत्पादन घेतले जात आहे. अशा वेळी आपला कृष्णा कारखाना चुकीच्या लोकांच्या हातात जाऊ नये, याची काळजी आपण सर्व सभासदांनी घेण्याची गरज आहे.

यावेळी प्रकाश कणसे, चंद्रकांत कणसे, अमोल पाटील, जयवंत पाटील, दिलीपकुमार कणसे, अशोक कणसे, संदीप पाटील, अविनाश माळी, लालासो पाटील, नारायण शिंगाडे, माणिक कणसे, रघुनाथ कणसे, वैभव कणसे, झाकीर मुल्ला, विजय गायकवाड, जालिंदर कणसे, आनंदा खुडे, तानाजी सूर्यवंशी, शरद सूर्यवंशी, पंडित कापूरकर पतंगराव कणसे आदी उपस्थित होते.

फोटो ओळी :

शेणोली ता.कराड येथे सहकार पॅनेलच्या प्रचार दौऱ्यावेळी बोलताना कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले.

Web Title: Krishna is in the forefront - Bhosle only because of the faith shown by the members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.