कृष्णा कांबळे ‘प्रेरणा गौरव’ने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:38 AM2021-03-18T04:38:54+5:302021-03-18T04:38:54+5:30
कृष्णा कांबळे यांनी आपल्या शैक्षणिक कार्याबरोबरच वृक्षलागवड व संवर्धन, प्लास्टिकमुक्तीसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक संस्थेच्या ...
कृष्णा कांबळे यांनी आपल्या शैक्षणिक कार्याबरोबरच वृक्षलागवड व संवर्धन, प्लास्टिकमुक्तीसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य, गणवेश वाटप करण्याचे काम करत आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण वाचनालयाची स्थापना करून वाचनसंस्कृती चळवळ राबवित आहेत. तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समता व मानवता रुजावी म्हणून व्याख्यानाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करीत आहेत.
कृष्णा कांबळे यांच्या कार्याबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते शासनाचा ‘वनश्री’ पुरस्कार व भारत सरकारचा नेहरू युवा पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप दिल्ली यांनी सन्मानित केले आहे. या कार्याबद्दल मुख्याध्यापक अशोक रुपनवर, शिक्षक दत्ता देसाई व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, तसेच केंद्रप्रमुख विलास पोळ, शालेय समिती अध्यक्ष प्रशांत पोळ, सल्लागार समितीचे अध्यक्ष अशोक मराठे, किसन वरखाडे, विजय मांढरे, रामदास पुजारी व तसेच विस्तार अधिकारी विष्णू नेमाणे यांच्यासह मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले आहे.