तामिळनाडूतही राबविणार ‘कृष्णा पॅटर्न’ : सत्तर शेतकऱ्यांची कारखान्यास भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:30 AM2018-08-11T00:30:43+5:302018-08-11T00:32:21+5:30
तामिळनाडू राज्यातील शासकीय अधिकारी, साखर कारखान्याचे शेती अधिकारी यांच्यासह सत्तर शेतकºयांनी नुकतीच अभ्यास दौºयानिमित्त कारखान्यास भेट दिली.
कºहाड : तामिळनाडू राज्यातील शासकीय अधिकारी, साखर कारखान्याचे शेती अधिकारी यांच्यासह सत्तर शेतकºयांनी नुकतीच अभ्यास दौºयानिमित्त कारखान्यास भेट दिली.
कारखान्याचे कामकाज व कारखाना राबवित असलेल्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांची पाहणी या शिष्टमंडळाने केली असल्याची माहिती कारखाना प्रशासनाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.
कारखाना प्रशासनाने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ सातत्याने शेतकरी सभासदांच्या हितासाठी नवनवीन उपक्रम राबवित असते. यामध्ये सभासद शेतकºयांचे उत्पादन वाढीसाठी जयवंत आदर्श कृषी योजना, शेतकरी संवाद मेळावे, अल्पदरात द्रवरूप जीवाणू खते, सेंद्रिय खते, माती परीक्षण, मोफत साखर, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने ऊसनोंदी, पारदर्शक तोडणी यंत्रणा यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे.
देशातील सहकारी साखर कारखानदारीला दिशादर्शक असणाºया यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची महती सर्वदूर पोेहोचली आहे. या कामकाजाची माहिती जाणून घेण्यासाठी तामिळनाडू राज्यातील शासकीय अधिकारी, सहकारी साखर कारखान्याचे शेती अधिकारी व तामिळनाडू राज्यातील विविध जिल्ह्यांतून सत्तर शेतकºयांच्या शिष्टमंडळाने कारखान्यास भेट दिली.
या अभ्यास दौºयाचे आयोजन तामिळनाडू शासनाचे कृषी खाते व भारतीय शुगर यांच्या वतीने आत्मा योजनेंर्तगत करण्यात आले होते. यावेळी भारतीय शुगर्सचे प्रेसिडेंंट विक्रमसिंह शिंदे, भारतीय शुगर्सचे उपाध्यक्ष सी. एन. देशपांडे, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, भारतीय शुगर्सचे जनरल मॅनेजर संग्रामसिंह शिंदे, डॉ. भास्करराव जाधव, पंकज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कारखाना राबवित असलेल्या योजनांची माहिती कारखान्याचे ऊसविकास अधिकारी पंकज पाटील यांनी दिली. प्रश्नांची समर्पक उत्तरे सहायक ऊसविकास अधिकारी शिवाजी बाबर व डॉ. विजयकुमार कुंभार यांनी दिली.