कृष्णा कारखाना निवडणुकीचा बिगुल वाजला, २९ जूनला मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 07:51 PM2021-05-24T19:51:24+5:302021-05-24T19:51:58+5:30

krushna sugar factory karad Election: निवडणुकीसाठी मंगळवारी २५ मे पासून १ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज कराड येथे दाखल करावयाचे आहेत. उमेदवारी दाखल अर्जांची छाननी २ जूनला सकाळी अकरापासून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सुरू होणार आहे.

Krishna sugar factory election declared, polling on June 29 | कृष्णा कारखाना निवडणुकीचा बिगुल वाजला, २९ जूनला मतदान

कृष्णा कारखाना निवडणुकीचा बिगुल वाजला, २९ जूनला मतदान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कराड : रेठरे बुद्रुक ता.कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी जाहीर झाली आहे. निवडणूकीसाठी २९ जूनला मतदान होणार आहे. तर मतमोजणी १ जुलैला होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश आष्टेकर यांनी सदरचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. (krushna sugar factory karad Election declared. )


 दरम्यान या निवडणुकीसाठी मंगळवारी २५ मे पासून १ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज कराड येथे दाखल करावयाचे आहेत. उमेदवारी दाखल अर्जांची छाननी २ जूनला सकाळी अकरापासून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सुरू होणार आहे. उमेदवार अर्ज माघारीची मुदत ३ जून ते १७ जूनपर्यंत सकाळी ११ ते ३ यावेळेत आहे. १८ जूनला निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. याच दिवशी चिन्ह वाटप होणार आहे तर २९ जूनला सकाळी आठ ते दुपारी पाच या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर १ जुलैला मतमोजणी होणार आहे

सातारा जिल्ह्यातील कराड सांगली जिल्ह्यातील वाळवा, कडेगाव, खानापूर, पलूस या पाच तालुक्यांमध्ये कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. अंतिम मतदार यादी नुसार कारखान्याचे ४७ हजार १६० सभासद मतदार आहेत. कारखान्याच्या निवडणुकीसाठी सहा गट करण्यात आले आहेत. यात वडगाव हवेली - दुशेरे गट ३, काले कार्वे गट ३, नेरले तांबवे गट ३, रेठरे हरणाक्ष बोरगाव गट ३, येडे माचिंद्र वांगी गट २, रेठरे शेनोली गत २ असे सहा गट आहेत. त्यातून १६ उमेदवार निवडले जाणार आहेत. तर राखीव गटात अनुसूचित जाती जमाती १, महिला राखीव २, इतर मागास प्रवर्ग१, विमुक्त जाती भटक्या जमाती १ असे ५ एकूण २१ उमेदवार निवडून द्यायचे आहेत.


कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य इमारतीच्या सभागृहात निवडणूक कार्यालय करण्यात आले आहे. तेथे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

Web Title: Krishna sugar factory election declared, polling on June 29

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.