हजारो हातांमुळे ‘कृष्णाकाठ’ निर्मल -: महास्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 07:20 PM2019-08-20T19:20:18+5:302019-08-20T19:25:21+5:30
‘चला, कृष्णा नदी वाचवूया,’ असा संदेश देत कृष्णाकाठी एकत्रित आले. पालिकेच्या वतीने आयोजित महास्वच्छता अभियानातून कृष्णाकाठ निर्मल केला.
क-हाड : स्वच्छ अन् सुंदर अशा कºहाड शहर व कृष्णा नदीपात्रास महापुराचा फटका बसला होता. पुरामुळे कृष्णाघाटास कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. यावर उपाय शोधत गत आठ दिवसांपासून क-हाड शहर स्वच्छतेत झटलेले हजारो हात ‘चला, कृष्णा नदी वाचवूया,’ असा संदेश देत कृष्णाकाठी एकत्रित आले. पालिकेच्या वतीने आयोजित महास्वच्छता अभियानातून कृष्णाकाठ निर्मल केला.
क-हाड येथील कृष्णा-कोयना नद्यांचा संगम लाभलेल्या प्रीतिसंगमस्थळी मंगळवारी कºहाड पालिकेच्या वतीने कृष्णा नदीत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी सुमारे दोन हजार शालेय विद्यार्थी, पंधराहून अधिक सामाजिक संस्था, हजारहून अधिक कºहाडकर नागरिक, लोकप्रतिनिधींनी सहभागी होत तीन तास स्वच्छता केली. यावेळी महापुरातील पाण्यातून वाहून आलेल्या गोधडी, झाडेझुडपे, कपडे, प्लास्टिक पिशव्या, बाटल्या या नदीपात्रातील झाडे, झुडपांमध्ये अडकले होते. ते एकत्रित करीत पालिकेच्या कचरा गाडीत टाकले. सुमारे चार तास केलेल्या स्वच्छतेनंतर कृष्णा नदीकाठ चकाचक दिसू लागला आहे.
कृष्णा नदीत केलेल्या महास्वच्छता अभियानात नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, मुख्याधिकारी यशवंत डांगे, नोडल आॅफिसर आर. डी. भालदार, अभियंंता ए. आर. पवार, नगरसेवक विजय वाटेगावकर, विनायक पावसकर, विद्या पावसकर, सदाशिव यादव, स्मिता हुलवान, सौरभ पाटील, सुहास जगताप, प्रीतम यादव, एनव्हायरो नेचर फें्रडस क्लबचे अध्यक्ष जालिंदर काशीद यांच्यासह सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभागी होत नदीकाठची स्वच्छता केली.
- चौकट
आरोग्यासाठी हँडग्लोज अन् मास्कचे वाटप
कºहाड येथील कृष्णा नदीकाठी पसरलेल्या दुर्गंधीतून कोणताही आजार उद्भवू नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली होती. सामाजिक संस्था व पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नागरिक, महाविद्यालयीन युवक, कर्मचाऱ्यांना हँडग्लोज व मास्कही देण्यात आले.
- चौकट :
चिंध्यांपासून ते गोधडीपर्यंत सोळा टन कचरा...
कºहाड पालिकेच्या वतीने मंगळवारी करण्यात आलेल्या कृष्णा नदीकाठावरील महास्वच्छता अभियानातून मोठ्या प्रमाणात कचरा गोळा झाला. त्यामध्ये नदीस आलेल्या महापुरातून वाहून आलेले व झाडाझुडपांत अडकलेल्या प्लास्टिक पिशव्या, चिंध्या, गोधडी यासह निर्माल्य, जलपर्णी असा सुमारे सोळा टन इतका कचरा, निर्माल्य पालिकेने कचरा गाडी, ट्रॅक्टरमधून घेऊन जाऊन वीज निर्मिती व खतनिर्मिती प्रकल्पाच्या ठिकाणी ठेवला.
- चौकट
‘चला... कृष्णा वाचवूया’चा संदेश
कºहाड शहराच्या स्वच्छतेबरोबरच कृष्णा नदीपात्राची स्वच्छताही करणे गरजेचे असल्याने विविध संस्थांतील सदस्य, नागरिकांनी या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी पार पडलेल्या स्वच्छता अभियानात हजारो कºहाडकर व विद्यार्थ्यांनी सहभागी होत नदीकाठी स्वच्छता केली. यावेळी दिसेल तो कचरा उचलत नदीकाठ स्वच्छ केला या अभियानाच्या माध्यमातून सर्वांनी ‘चला.. कृष्णा वाचवूया,’ असा संदेश दिला.
- कोट
कºहाड शहर स्वच्छतेप्रमाणे नदीस्वच्छतेची जबाबदारी सर्वांची आहे. महापुरामुळे नदीकाठी मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. तो आता महास्वच्छता अभियानाच्या माध्यमातून हटविला आहे. यामध्ये कºहाडकरांनी मोलाचे सहकार्य केले आहे.
- यशवंत डांगे
मुख्याधिकारी, कºहाड पालिका
- चौकट
चार तासांत नदीकाठ चकाचक़..
सकाळी साडेसात वाजता सुरू करण्यात आलेले कृष्णा नदीपात्रातील महास्वच्छता अभियान हे सुमारे साडेअकरा वाजेपर्यंत म्हणजे चार तास चालले. यावेळी कृष्णा नदीघाटापासून ते स्मशानभूमी परिसरापर्यंतचा परिसर नागरिक, विद्यार्थी, युवक, कर्मचाºयांनी एकत्रितपणे येऊन चकाचक केला.