‘कृष्णा’चा निवडणूक कार्यक्रम उद्या जाहीर होण्याची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:40 AM2021-05-18T04:40:01+5:302021-05-18T04:40:01+5:30

कराड : रेठरे बुद्रुक (ता.कराड )येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची पूर्वप्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक ...

Krishna's election program likely to be announced tomorrow! | ‘कृष्णा’चा निवडणूक कार्यक्रम उद्या जाहीर होण्याची शक्यता!

‘कृष्णा’चा निवडणूक कार्यक्रम उद्या जाहीर होण्याची शक्यता!

Next

कराड : रेठरे बुद्रुक (ता.कराड )येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची पूर्वप्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टीकर यांची नियुक्ती केली आहे.आष्टीकरांनी निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्याकडे संभाव्य निवडणूक कार्यक्रम मंजुरीसाठी पाठविला असून त्याला मंगळवार(दि. १८) पर्यंत मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. त्यानंतर लगेचच अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. दरम्यान, याबाबत सभासदांत उत्सुकता लागून राहिली आहे.

कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम झाली असून ४७ हजार १६0 मतदारांचा त्यात समावेश आहे.मतदार यादी अंतिम झाल्याच्या तारखेपासून १0 दिवसानंतर व १९ दिवसांच्या आत कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम कायद्यानुसार जाहीर करावा लागतो. त्यानुसार १५ ते २५ मे दरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो.

शुक्रवारी सहकारी निवडणूक प्राधिकरणकडून कारखान्याच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टीकर व सहायक निवडणूक अधिकारी म्हणून कराडचे उपनिबंधक मनोहर माळी यांच्यासह तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम तयार करून त्याच दिवशी निवडणूक प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.आता फक्त मंजुरीची औपचारिकता बाकी आहे.

दरम्यान, २६ जूनला कारखाना निवडणुकीसाठी मतदान, २८ जूनला मतमोजणी तर अर्ज दाखल करण्याची मुदत १९ ते २५ मे, १२ जून अर्ज माघार असा संभाव्य कार्यक्रम राज्य प्राधिकरणाकडे पाठवण्यात आल्याचे खात्रीशीर समजते.पण अधिकृत घोषणा झाल्यावरच त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

कोट

निवडणूक प्राधिकरणाकडे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा संभाव्य कार्यक्रम पाठविला आहे. त्याला मंगळवारी (दि.१८)मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे.त्यानंतर निवडणूक कार्यक्रम अधिकृत जाहीर करण्यात येईल.

- प्रकाश आष्टीकर

निवडणूक निर्णय अधिकारी

फोटो

कृष्णा कारखान्याचा संग्रहित फोटो

Web Title: Krishna's election program likely to be announced tomorrow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.