कृष्णाची मतमोजणी अन् पोलिसांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:26 AM2021-07-02T04:26:51+5:302021-07-02T04:26:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आणि पोलिसांची दमछाक असे चित्र कऱ्हाड येथे गुरुवारी पाहायला मिळाले. ...

Krishna's vote counting is a chore for the police | कृष्णाची मतमोजणी अन् पोलिसांची दमछाक

कृष्णाची मतमोजणी अन् पोलिसांची दमछाक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आणि पोलिसांची दमछाक असे चित्र कऱ्हाड येथे गुरुवारी पाहायला मिळाले. मतमोजणी केंद्रासमोरचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी याबाबतचे आदेश काढले होते. तरीही अनेक वाहनधारक या रस्त्यावर बसण्याचा प्रयत्न करत होते, या रस्त्यावर बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांची मात्र वाहनधारकांना समजावताना दमछाक झाली.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणुकीसाठी कऱ्हाड-कार्वे रस्त्यावरील रत्नागिरी गोडाउनमध्ये मतमोजणी सुरू होती. सातारा, सांगली जिल्ह्यांत शहर संपूर्ण राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले असल्याने तसेच न्यायालयाच्या आदेशानंतर कोरोना प्रतिबंधित काळात देखील निवडणूक घ्यावी लागली. सर्वोच्च यंत्रणेवर सध्या ताण पाहायला मिळतो.

दरम्यान, मतमोजणीच्या निमित्ताने शहरातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. भेदा चौकापासून कार्वे नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर चार ठिकाणी बॅरिकेट्स लावून पोलिसांनी रस्त्यावर बंदोबस्त ठेवला. हा बंदोबस्त भेदून काही वाहनचालक जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना हटकले.

अनेकजण विविध कारणे देऊन निसटायचा प्रयत्न करत होते. दवाखान्यात जायचे आहे, आमचे घर जवळ आहे, गावाला जायला हाच मार्ग आहे, अशी कारणे देऊन वाहनधारक पोलिसांना अक्षरश: भंडावून सोडत होते. मात्र पोलीस व कर्तव्य बजावण्यात कुठेही कमी पडले नाहीत. कऱ्हाडमधून बाहेर पडायला अनेक मार्ग आहेत, निवडणुकीची मतमोजणी पूर्ण होईपर्यंत कोणालाही या रस्त्यावरून जाता येणार नाही, असे स्पष्ट करत पोलिसांनी आपला वचक दाखवला.

चौकट

आलिशान कारचालक अर्धा तास थांबला अन् शेवटी कंटाळून गेला..

कऱ्हाड-कार्वे रस्त्यावरील कोयना बँकेच्या समोर चौकामध्ये पोलीस बॅरिकेट्स लावून थांबले होते. कारचालक तिथे येऊन थांबला. सुरुवातीलाच दमाच्या भाषेत बोलू लागल्यानंतर पोलिसांनी देखील त्याला त्याच भाषेत त्याला समजावले. पोलिसांचा अवतार पाहून हा वाहनचालक थोडा नरमला. काही वेळाने कंटाळून तो मागील रस्त्याने निघून गेला.

कोट..

निवडणूक मतदानाच्या निमित्ताने पोलिसांना कडेकोट बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. तरीही समाजात व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. पोलिसांना लोकांनी त्यांचे काम करू दिले नाही तर पोलीस कायदेशीर बंदोबस्त करू शकतात.

- बी. आर. पाटील

वरिष्ठ पोलीस निरीक्षक

फोटो आहे : कऱ्हाड येथील भेदा चौक ते कार्वे नाका रस्त्यावरील कोयना बँकेच्या समोर हुज्जत घालणाऱ्या वाहनचालकांना पोलीस समजावत होते.

Web Title: Krishna's vote counting is a chore for the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.