कुकुडवाड-नंदीनगर रस्ता उरला केवळ नावापुरताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 04:18 PM2020-11-02T16:18:03+5:302020-11-02T16:19:33+5:30
Roadsefty, trafic, sataranews कुकुडवाड ते मायणी या रस्त्यावर असलेल्या कुकुडवाड (नंदीनगर) येथील खिंड वाहतुकीला धोकादायक ठरू लागली आहे. धोकादायक वळणावरील संरक्षक कठडे व रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कुकुडवाड ते नंदीनगर या पाच किलोमीटरच्या रस्त्यावरून येजा करताना वाहनधारकांच्या काळाजाचा ठोकाच चुकत आहे.
कुकुडवाड : कुकुडवाड ते मायणी या रस्त्यावर असलेल्या कुकुडवाड (नंदीनगर) येथील खिंड वाहतुकीला धोकादायक ठरू लागली आहे. धोकादायक वळणावरील संरक्षक कठडे व रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कुकुडवाड ते नंदीनगर या पाच किलोमीटरच्या रस्त्यावरून येजा करताना वाहनधारकांच्या काळाजाचा ठोकाच चुकत आहे.
माण तालुक्याच्या दक्षिणेला नंदीनगर येथील खिंड म्हणजेच एक ते दीड किलोमीटरचा वळणाचा घाट आहे. या घाटात वेडीवाकडे वळणे आहेत. ही खिंड माण व खटाव या दोन तालुक्यांच्या सीमेवर असून, या रस्त्यावरून विटा, तासगाव, सांगली, कोल्हापूर या भागाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. कुकुडवाड ते नंदीनगर खिंड या पाच किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. साईडपट्ट्या खचल्या आहेत. संरक्षक कठडेही नावापुरतेच उरले आहेत.
या घाटरस्त्यात काही आजवर अनेक अपघात झाले आहेत. या धोक्याची पूर्वकल्पना देऊन सुद्धा दहिवडी सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ व वाहनधारकांमधून केला जात आहे. वाहनधारक व प्रवाशांचे हित लक्षात घेता या खिंडीतील संरक्षक कठड्यांची व रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
कुकुडवाड गावापासून ते नंदीनगर खिंड या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाला आहे. त्यामुळे प्रवासी व वाहनधारकांना या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाने या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
- उमेश काटकर,
पोलीस पाटील, कुकुडवाड