भोसरे येथील शेतकऱ्याच्या मदतीला धावले कुमठे ग्रामस्थ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:40 AM2021-04-27T04:40:14+5:302021-04-27T04:40:14+5:30
औंध : खटाव तालुक्यातील भोसरे येथील शेतकऱ्याची गंजी मागील दोन दिवसांपूर्वी शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाली होती. आता वर्षभर जनावरांना ...
औंध : खटाव तालुक्यातील भोसरे येथील शेतकऱ्याची गंजी मागील दोन दिवसांपूर्वी शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाली होती. आता वर्षभर जनावरांना काय घालायचे, या विवंचनेत असणाऱ्या शेतकऱ्याला नागाचे कुमठे येथील ग्रामस्थांनी मदतीचा हात देत एक ट्रॉली वैरण भरून मदत केली आहे.
भोसरे येथील शेतकरी रायसिंग जाधव यांच्या शेताजवळून विजेच्या तारांमधून स्पार्क होऊन त्याच्या ठिणग्या गंजीवर पडल्याने वैरण भस्मसात झाली तसेच एक दुचाकीही जळाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागाचे कुमठे येथील माजी सभापती संदीप मांडवे यांनी घटनास्थळी धाव घेत अधिकाऱ्यांना फोन लावून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी काय करता येईल, याची माहिती घेतली तर दुसरीकडे नागाचे कुमठे येथीलच अंकुश फडतरे, शिदू फडतरे, पै. मंगेश फडतरे, संजय फडतरे, पै. अमोल फडतरे, बाबूराव फडतरे, सदाशिव मांडवे, संतोष मांडवे, शंकर फडतरे, पै. विकास फडतरे, दीपक फडतरे, किरण माने, प्रशांत फडतरे, सचिन मांडवे, सुनील फडतरे, बाळू माने, रामभाऊ शिखरे यांनी ट्रॅक्टर भरून वैरण रायसिंग जाधव यांना दिली. त्यामुळे नागाचे कुमठे ग्रामस्थांनी केलेल्या या मदतीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
२६ औंध
फोटो : नागाचे कुमठे येथील ग्रामस्थांनी भोसरे येथील शेतकऱ्याला ट्रॅक्टर भरून वैरण देत मदतीचा हात दिला आहे. (छाया : रशीद शेख)