कोयना नदीपात्रात हातपाय धुवायला गेला अन् जिवाला मुकला, कुसुरच्या युवकाचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 04:11 PM2022-03-03T16:11:04+5:302022-03-03T16:12:37+5:30

युवकाचा मृतदेह आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास घटनास्थळापासून काही अंतरावर सापडला.

Kusur youth dies after drowning in Koyna river basin | कोयना नदीपात्रात हातपाय धुवायला गेला अन् जिवाला मुकला, कुसुरच्या युवकाचा बुडून मृत्यू

कोयना नदीपात्रात हातपाय धुवायला गेला अन् जिवाला मुकला, कुसुरच्या युवकाचा बुडून मृत्यू

Next

मलकापूर : कोयना नदीपात्रात हातपाय धुवायला गेल्यावर पाय घसल्याने कुसुर येथील युवकाचा बुडुन मृत्यू झाला. कोयना नदीच्या पाण्याला प्रवाह असल्यामुळे युवकाचा मृतदेह आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास घटनास्थळापासून काही अंतरावर सापडला. अक्षय हनुमंत पाटील (वय २५, रा. कुसुर ता. कऱ्हाड) असे मृत्यू युवकाचे नाव आहे.

दरम्यान संबंधित युवकाला पोहायला येत नव्हते. हातपाय धुवायला गेल्यावर पाय घसरल्याने ही दुर्घटना घडली अशी घटनास्थळावरील व्यक्तींनी सांगितले. ही घटना चचेगाव जुनेगावठाण परिसरातील पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलजवळ काल, बुधवारी घडली.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार, अक्षय पाटील हा कऱ्हाड परिसरात कंत्राटदारांकडून मिळालेली ड्रेनेजसह विविध कामे करत होता. बुधवारी सायंकाळी पाच वाजता मलकापुरातील काम आटोपून तो कुसुर येथे गावी जाण्यासाठी निघाला होता. जाताजाता मित्राला फोन केला. मित्राचे चचेगाव येथील जुनेगावठाण परिसरात नदिपात्रालगत काम सुरू असल्याचे सांगितले. तो त्याला भेटण्यासाठी चचेगाव येथील कोयना नदीपात्राकडे गेला.

नदीपात्रात हातपाय धुवून येतो असे म्हणून तो नदीपात्राकडे गेला. हातपाय धुताना पाय घसरून नदीपात्रात पडला. पोहायला येत नसल्यामुळे पात्रातील पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. यावेळी अक्षय ‘वाचवाऽऽऽ वाचवाऽऽऽ’ म्हणून आरडा ओरडा केला. मात्र मित्र काही अंतरावर त्याच्या कामात मग्न असल्यामुळे व बचावासाठी जवळ कोणीही नसल्यामुळे तो नदीपात्रात बुडाला.

ही माहिती मित्राने चचेगाव येथील ग्रामस्थांसह नातेवाईकांना दिली. घटनेची माहिती मिळताच चचेगावचे पोलीस पाटील प्रशांत पवार, ग्रामविकास अधिकारी दिपक दवंडे यांच्यासह कोळे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

काल, बुधवारी उशिरा पर्यंत शोधाशोध केली मात्र मृतदेह सापडला नाही. आज, गुरूवारी सकाळी पुन्हा पोलिसांच्या मदतीने मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले असता  घटनास्थळापासून काही अंतरावर अक्षयचा मृतदेह सापडला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.

Web Title: Kusur youth dies after drowning in Koyna river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.