स्वच्छ भारत अभियानांतर्गत कोरेगावात अधिकाऱ्यांचे श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:34 AM2021-01-21T04:34:46+5:302021-01-21T04:34:46+5:30
कोरेगाव : स्वच्छ भारत अभियानांतर्गत कोरेगाव शहरात नगर पंचायत आणि पोलीस दलाच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. परिविक्षाधीन ...
कोरेगाव : स्वच्छ भारत अभियानांतर्गत कोरेगाव शहरात नगर पंचायत आणि पोलीस दलाच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्यासह मुख्याधिकारी विजया घाडगे व कर्मचाऱ्यांनी रहिमतपूर रस्ता परिसर स्वच्छ केला.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर स्वच्छ व सुंदर असावे, या भावनेतून जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी ज्योती पाटील, जिल्हा प्रशासन अधिकारी सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्षा रेश्मा कोकरे, उपनगराध्यक्षा मंदा बर्गे व नगरसेवकांच्या सहकार्याने नगर पंचायत आणि पोलीस दलाच्यावतीने हे अभियान राबविण्यात आले.
पोलीस ठाण्याच्या आवारात परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपअधीक्षक गणेश किंद्रे व मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली. रहिमतपूर रस्ता परिसर, मॉडर्न विद्यालय परिसर, डी. पी. भोसले महाविद्यालय परिसरात हे अभियान राबविण्यात आले. पोलीस व नगर पंचायतीचे कर्मचारी या अभियानात सहभागी झाले होते. यावेळी मॉडर्न विद्यालयाच्या पटांगणावर सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली.
फोटो : २० कोरेगाव
कोरेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात नगर पंचायत व पोलीस दलाच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी रितू खोखर, गणेश किंद्रे, विजया घाडगे व कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले.