परतीच्या पावसाने खरीप पिकांची नासाडी--परतीच्या पावसाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 11:56 PM2017-10-13T23:56:11+5:302017-10-13T23:56:11+5:30
मलकापूर : परतीच्या पावसाने सर्वत्र थैमान घातले असून, या पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. सततच्या पावसाने खरीप हंगामातील हायब्रीड, ज्वारीचे पीक काळे पडत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : परतीच्या पावसाने सर्वत्र थैमान घातले असून, या पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. सततच्या पावसाने खरीप हंगामातील हायब्रीड, ज्वारीचे पीक काळे पडत आहे. तर सोयाबीनसह भुईमुगाची पिके कुजत असल्यामुळे हातात आलेल्या पिकांचे वाटोळे होत आहे. एका बाजूला निसर्ग तर दुसºया बाजूला सोयाबीन खरेदी बंद अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकºयांच्या हाताशी आलेला घास हिसकावला जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
तालुक्यात सध्या गडगडाटासह जोरदार पाऊस रोजच हजेरी लावत आहे. काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अचानक येत असलेल्या जोराच्या पावसामुळे भाजीपाला पिकांच्या शेतात पाणी साचून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा परिणाम म्हणून बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर वधारले आहेत.
पावसाने खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काढणीचा हंगाम सुरू असलेल्या सोयाबीन व भुईमूग पीक शेतातच कुजत आहे. ऐन सणासुदीच्या काळातच या नगदी पिकांचे वाटोळे होत असल्यामुळे शेतकºयांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. हायब्रीड, ज्वारी हे खरीप हंगामातील पीक चांगले आले होते. महामार्गाच्या पश्चिमेकडील नांदलापूर, धोंडेवाडी, चचेगावसह अनेक गावांत हायब्रीड ज्वारीचे पीक सध्या जोमात आले आहे. मात्र, सततच्या पावसाने हे पीक काळे पडले आहे. वर्षभराची खाण्याची सोय होणार, अशी आशा लागलेल्या शेतकºयांच्या चिंतेत भरच पडत आह
मलकापूर, कापील, जखिणवाडी, नांदलापूर, चचेगावसह परिसरात भाजीपाला पिके घेणाºया शेतकºयांची संख्या जास्त आहे. सध्या पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांसह टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी, कारले, ही वेलवर्गीय पिके घेतली जातात. भेंडी, गवारी यासारख्या शेंगवर्गीय भाजीवर सकाळी पडत असलेल्या धुक्यामुळे किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पावसामुळे पालेभाज्याच्या रानात पाणी साचल्याने या पिकांचे नुकसान झाले आहे.
गुºहाळाची घरघर थांबली
गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर चचेगावसह परिसरातील काही गुºहाळ व्यावसायिकांनी आपला व्यवसाय सुरू केला होता. मात्र, महिन्यापासून जोरदार पावसामुळे शेतकºयांच्या रानात पाणी साचल्यामुळे उसाची वाहतूक करण्यात अडचणी येत आहे. परिणामी, व्यावसायिकांना गुºहाळाची घरघर थांबवावी लागली आहे. याचा परिणाम म्हणून गुºहाळात काम करण्यासाठी आलेल्या कामगारांचे संसार चालविण्यासाठी गुºहाळ मालकाला पदरमोड करावी लागत आहे. गुºहाळाची घरघर थांबली.सर्वांचा पोशिंदा दुहेरी संकटात
एका बाजूला सातत्याने अतिवृष्टीमुळे पिके काढता येत नसल्यामुळे रानातच कुजत आहेत. म्हणून शेतकºयांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे अनेक अडचणींचा सामना करून शेतकºयाने काढलेल्या मालाला हमीभाव देण्यावरून व्यावसायिकांनी सोयाबीन खरेदी बंद केली आहे. अशा संकटालाही शेतकºयांना तोंड द्यावे लागत आहे. एकूणच सर्वांचा पोशिंदा सध्या दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र दिसत आहे.