कऱ्हाडात डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर नळातून पाण्यासोबत अळ्या, नागरिकांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 05:35 PM2017-11-04T17:35:42+5:302017-11-04T17:47:49+5:30
कऱ्हाडात बुधवार पेठेतील पंचशील चौकात नागरिकांना सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या नळातून शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास अळ्या आढळल्या. यावेळी त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना बोलावले असता कार्यकर्त्यांनी या प्रकाराला वाचा फोडली. त्यांनी पालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना धारेवर धरले . यावेळी नागरिक, मनसेचे कार्यकर्ते आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
कऱ्हाड (सातारा) ,दि. ०४ : बुधवार पेठेतील पंचशील चौकात नागरिकांना सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या नळातून शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास अळ्या आढळल्या. यावेळी त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना बोलावले असता कार्यकर्त्यांनी या प्रकाराला वाचा फोडली. त्यांनी पालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना धारेवर धरले .
घटनास्थळी बोलवून घेऊन जाब विचारला. तसेच विभागाच्या नगरसेवकांनाही त्या ठिकाणी बोलवून घेण्यात आले. सुरुवातीला पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी नळाला गळती लागल्याने गटारातून अळ्या नळामध्ये गेल्या असाव्यात, असे सांगून बचाव करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, मनसेचे कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांना धारेवर धरत गळती कुठे आहे ते आधी दाखवा, असे सुनावले. तसेच आसपासच्या इतर नळांतून येणाऱ्या पाण्याची पाहणी करून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करा, अशी मागणी केली. यावेळी नागरिक, मनसेचे कार्यकर्ते आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
कऱ्हाड शहराध्यक्ष सागर बर्गे, आरपीआयचे युवराज काटरे, प्रीतम यादव, महेश कांबळे यांच्यासह काही संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.