लघुरुद्र, हवन, महाभिषेकाने नटराज मंदिरात महाशिवरात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:10 AM2021-03-13T05:10:41+5:302021-03-13T05:10:41+5:30

सातारा : कांची कामकोटी पीठाचे महास्वामी शंकराचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती तसेच शंकराचार्य जयेंद्र सरस्वती व त्यांचे परमशिष्य व विद्यमान ...

Laghurudra, Havan, Mahabhishekane Nataraja temple Mahashivaratri | लघुरुद्र, हवन, महाभिषेकाने नटराज मंदिरात महाशिवरात्री

लघुरुद्र, हवन, महाभिषेकाने नटराज मंदिरात महाशिवरात्री

Next

सातारा : कांची कामकोटी पीठाचे महास्वामी शंकराचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती तसेच शंकराचार्य जयेंद्र सरस्वती व त्यांचे परमशिष्य व विद्यमान शंकराचार्य परमपूज्य शंकर विजयेंद्र सरस्वती यांच्या आशीर्वादाने सातारा येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात महाशिवरात्री महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. दरवर्षी हा कार्यक्रम महोत्सव रूपात गायन, वादन, नृत्य कार्यक्रमांनी रंग भरत असतो. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे केवळ एकच दिवसांमध्ये धार्मिक पूजा, हवन आणि विधी करून महाशिवरात्री महोत्सव झाला. जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियम, अटीनुसार गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून अनुज्ञा, विघ्नेश्वर पूजा झाली. त्यानंतर मंदिराचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त रमेश शानभाग व पत्नी उषा यांच्या हस्ते प्रधान संकल्प होऊन पुण्याहवाचन, ग्रामदेवता पूजन, नांदी श्राद्ध हे धार्मिक विधी झाले. त्यानंतर वेदमूर्ती दत्ता शास्त्री जोशी व वेदमूर्ती जगदीश भट यांच्या हस्ते गणपती होम, नवग्रह होम करण्यात आला. त्यानंतर कलश स्थापना करून १५ ब्रह्मवृंद यांच्या उपस्थित महान्यास, महारुद्र, जप लघुरुद्र, महामंगल आरती होऊन या कलशातील मंत्रोच्चार केलेले पाणी मंदिरातील मुलनाथेश्वरास जलाभिषेक स्वरूपात घालण्यात आले.

यावेळी सातारा येथील स्वरसाधना संगीत विद्यालयाच्या कलाकारांनी नटराज मंदिराच्या गाभार्‍यापुढे आपली गायन सेवा सादर केली. यामध्ये प्रथितयश युवा कलाकार गायक यश सारंग कोल्हापुरे यांनी भैरव रागाची आळवणी केली. त्यानंतर अबिर गुलाल उधळीत रंग.. हा अभंग सादर केला. यशला तबल्यावर साथ अमेय देशपांडे यांनी केली, तर संवादिनीवर साथ शुभांगी थत्ते यांनी केली. त्यानंतर याच विद्यालयाच्या गायिका प्रज्ञा लाटकर यांनी कोमल रिषभ आसावरी रागात.. सर परता बिलावल.. ही बंदिश सादर करून त्यानंतर.. अवघे गरजे पंढरपूर.. हा अभंग सादर केला.

सायंकाळी साडेसहा वाजता चंद्रशेखरेंद्र सरस्वती नृत्य मंचावर नटराज नृत्यकला शाळेच्या गुरू आंचल घोरपडे व सात सहकलाकारांचे शंकरावर असलेल्या विविध रचनांवर भरतनाट्यम सादर झाले. रात्री ९ ते १२ दरम्यान नटराज मंदिरातील पाचूचे शिवलिंगास विशेष अभिषेक करण्यात आला. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मंदिरामध्ये भाविकांना एकेकाला दर्शनासाठी पुढे पाठवले जात होते. दर्शन घेऊन हे भाविक मंदिरातून बाहेर पडल्यानंतरच पुढील भाविकांना दर्शनासाठी अतिशय शिस्तबद्धपणे सोडण्यात येत होते.

फोटो ११नटराज

साताऱ्यातील श्री

उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात गुरुवारी महाशिवरात्रीनिमित्ताने लघुरुद्र हवन करण्यात आले. यावेळी वेदमूर्ती दत्ता शास्त्री जोशी, वेदमूर्ती जगदीश भट उपस्थित होते. (छाया : जावेद खान)

Web Title: Laghurudra, Havan, Mahabhishekane Nataraja temple Mahashivaratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.